हवामान विभागाने नवीन दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तसेच राज्यात गेल्या महिन्यामध्ये सुद्धा पावसाने जोरदार प्रकारची हजेरी लावलेली होती व या कालावधीमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे व नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारची स्थिती सुद्धा निर्माण झालेली होती, तसेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून इतर राज्यांमध्ये मान्सून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे,परंतु सध्या स्थितीमध्ये राज्यात मान्सून परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. परंतु राज्यांमध्ये लवकरच मानसून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.
राज्यामध्ये मान्सून परतीच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मात्र राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, येत्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. विदर्भ, कोकणातील काही भागांमध्ये हा पाऊस असू शकतो.
हवामान विभागाअंतर्गत विविध प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहे व त्यानुसार पुढील 48 तासांसाठी दिलेल्या अंदाजानुसार अनेक भागांमध्ये अधून मधून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे, त्यामध्ये मुंबई, ठाणे व पुणे यांचा समावेश असेल. बंगालच्या उपसागरामध्ये व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे व या कारणाने राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 टक्के पीक विमा वाटप सुरू होणार