Fertilizer prices : शेतकऱ्यांना चिंता देणारी बातमी, या कारणाने खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी व चिंताजनक बातमी आहे व ती बातमी शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या खतांबाबत आहे, देशामध्ये खतांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीवर अतिरिक्त खर्च करावा लागेल, कारण शेती म्हटल्यास त्यामध्ये खतांचा उपयोग येतोच, अशा परिस्थितीमध्ये जर खताच्या किमतीमध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांचा शेतीवरील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल.

खतांच्या किमतीमध्ये वाढ होण्याचे नेमके कारण काय हा तर प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल, शेतकऱ्यांनो आपल्या भारत देशामध्ये डीएपी हे खत रशियाच्या कंपन्यांकडून सवलतीमध्ये देण्यात येत असते, या कारणाने देशातील शेतकऱ्यांना डीएपी खत स्वस्त दरामध्ये मिळते. परंतु रशियाच्या कंपन्यांनी डीएपी खत सवलती मध्ये देणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना डीएपी खतासाठी जास्त प्रमाणात किंमत मोजावी लागणार असल्याचे दावे केले जात आहे.

रशियन कंपन्या खतांची विक्री बाजारपेठेमध्ये असलेल्या दराने करणार आहे त्यामुळे याचा फटका देशातील खताच्या किमतीवर बसण्याची शक्यता आहे, परंतु यामध्ये जर सरकारनी खतांवर शेतकऱ्याला अनुदान वाढवले तर शेतकऱ्यांना खताच्या किमतीचा फटका बसणार नाही परंतु या सर्वांचा भार सरकारवर पडेल. परंतु रशियन कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खतांचा विषय चिंता दायक ठरू शकतो.

भारतामध्ये रशियन कंपन्यांकडून सवलती मध्ये खत उपलब्ध होत होते, या कारणाने भारत रशियाकडून जास्त प्रमाणात खतांची आयात करायचा, परंतु कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये खतांच्या बाबतीत जास्त किंमत मोजावी लागते की काय, हा मोठा प्रश्न पडलेला आहे.

Fertilizer prices : शेतकऱ्यांना चिंता देणारी बातमी, या कारणाने खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

देशामध्ये 17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजना चालू, विना गॅरेंटी कर्जाचा देशातील तब्बल 30 लाख नागरिकांना लाभ मिळणार

Leave a Comment