राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तातडीने, नुकसान भरपाई देण्यात यावी, बुवनेश्वरी एस यांच्या निर्देशानुसार कृषी विभाग तसेच विमा कंपनीने शेती पिकांचे सर्वेक्षण लवकरात लवकर करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यावी.
पिक विमा योजनेअंतर्गत पिकांची नुकसान भरपाईचनिश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त सभेत मध्ये बुवनेश्वरी तसेच इतर सदस्य उपस्थित होते त्यामध्ये अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राची शास्त्रज्ञ डॉक्टर भारत गीते, तसेच इतर सदस्य सभेमध्ये उपस्थित होते.
सभेमध्ये बुवनेश्वरी एस बोलताना म्हणाल्या, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेती पिकांची नुकसान झालेले आहे, व अशा अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार सुद्धा केलेली आहे, परंतु अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा कंपनी अंतर्गत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपनी तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.
तसेच सभेमध्ये बोलत असताना श्री शहा म्हणाले चार आठवडे पाऊस कमी झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या उत्पादनावर सुद्धा या पावसाचा प्रभाव पडेल. त्यामुळे सर्वांकडून शेतकऱ्यांना तातडी नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे.