Disbursement of Funds : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निधी वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये अनुदान, बघा संपूर्ण माहिती

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते नीधी वितरित केलेला आहे, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधीचे वितरण करण्यात येणार आहे. कांदा अनुदानाच्या वितरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ सहा सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे.

राज्य शासना अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटल पर्यंतच्या मर्यादेमध्ये कांदा अनुदान देणार असल्याबाबतचा शासन निर्णय 18 ऑगस्ट 2023 रोजी काढण्यात आलेला होता. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री एक फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधी दरम्यान केलेली असेल असे कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटल पर्यंतच्या मर्यादेमध्ये कांदा अनुदान देण्यात येणार आहे परंतु हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहे, ज्या जिल्ह्यातील मागणी दहा कोटी पेक्षा जास्त असेल अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे तर उर्वरित अनुदान नंतर देण्यात येईल, व ज्या जिल्ह्यातील मागणी दहा कोटी पेक्षा कमी असेल अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेले जिल्हे

नाशिक,धुळे,जळगाव,कोल्हापूर,बीड,उस्मानाबाद,पुणे,सोलापूर,

अहमदनगर,औरंगाबाद

या दहा कोटी पेक्षा कमी मागणी असलेले जिल्हे

 

अमरावती,बुलढाणा,चंद्रपूर,वर्धा.लातूर,यवतमाळ,अकोला,जालना,वाशिम ,नागपूर,रायगड, सांगली, सातारा,ठाणे

अशाप्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाची वितरण करण्यात येणार आहे तसेच, तीनशे कोटी रुपये तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार आहे.

Disbursement of Funds : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निधी वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये अनुदान, बघा संपूर्ण माहिती

 राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील शबरी घरकुल आवास योजनेचा अर्ज नमुना व कागदपत्रे या संबंधीचा GR निर्गमित