Vishwakarma Yojana : देशामध्ये 17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजना चालू, विना गॅरेंटी कर्जाचा देशातील तब्बल 30 लाख नागरिकांना लाभ मिळणार

देशामध्ये 17 सप्टेंबर 2023 पासून विश्वकर्मा योजना चालू करण्यात येणार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला विश्वकर्मा योजनेची घोषणा केलेली होती, व त्यानुसार 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे व त्या दिवशी देशांमध्ये Vishwakarma Yojana चालू करण्यात येणार आहे.

देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, व अशा तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची इच्छा असते परंतु पैशाच्या अभावी, इच्छेला मोडवावी लागते, व तरुणांवर अशी परिस्थिती ओढवली जाऊ नये या कारणाने देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर पासून चालू करण्यात येणार आहे.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील नाविक, कारपेंटर, कुलपाची दुरुस्ती करणारे कारागीर,सोनार, मूर्तिकार, चटई झाडू बनवणारे कारागीर, लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर, तसेच धोबी, मच्छीमार, सलून मध्ये काम करणारे कारागीर,टेलर, मोची, लोहार, इत्यादींना विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे

विश्वकर्मा योजनेसाठी 13000 कोटी रुपयांच्या कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, तसेच या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना विना गॅरंटी एक लाखापर्यंतचे कर्ज मिळणार, तसेच पहिल्या टप्प्यांमध्ये एक लाख तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख एवढे कर्ज पाच टक्के व्याजदर देण्यात येईल. त्यामुळे देशातील नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी विश्वकर्मा योजना मदतकारक ठरणार आहे.

Vishwakarma Yojana : देशामध्ये 17 सप्टेंबर पासून विश्वकर्मा योजना चालू, विना गॅरेंटी कर्जाचा देशातील तब्बल 30 लाख नागरिकांना लाभ मिळणार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निधी वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 हजार रुपये अनुदान, बघा संपूर्ण माहिती