राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई चा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासना अंतर्गत मान्यता देण्यात आलेली आहे, राज्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात येते.
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती व या कारणाने त्यांना नुकसान भरपाई निधी वितरीत केला जाणार आहे, त्यामध्ये यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्यांचा समावेश आहे व चार जिल्ह्यांना एकूण नुकसान भरपाईचा निधी 22 कोटीं 86 लाख रुपये वितरित करण्यात येईल.
या जिल्ह्याला एवढा निधी
1. अमरावती – मे – शेतकरी 6620 – 12 कोटी 9 लाख रुपये
2. यवतमाळ – मे – शेतकरी 7603 – 8 कोटी 12 लाख 63 हजार रुपये
3. बुलढाणा – मे – शेतकरी 11 – 74 हजार रुपये
4. बुलढाणा – एप्रिल- शेतकरी 2391 – 2 कोटी 48 लाख रुपये
5. वाशिम – मे – शेतकरी 206 – 14 लाख 64 हजार रुपये
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय 12 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला आहे, तसेच नुकसान भरपाई चा निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तसेच मदतीमेचा तपशील जिल्ह्यातील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. वितरित करण्यात आलेला निधी बँकांनी कर्ज खात्यात वसूल करू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सुचित कराव्या. अशाप्रकारे वरील प्रमाणे दिलेल्या चार जिल्ह्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल.
आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रासह या तारखेपर्यंत अर्ज करा