शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती, व अशातच पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे, व या Pm Kisan 14th Installment Date संबंधित अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 14 व नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे म्हणजेच केंद्र सरकारच्या दोन हजार रुपयाचा हप्ता व राज्य शासनाचा दोन हजार रुपयाचा हप्ता असे एकूण चार हजार रुपयाची रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
केंद्र शासना अंतर्गत पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले होते, व आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक होते, व ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये आधार कार्ड लिंक केलेले होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता पडलेला होता, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खातेशी लिंक व केवायसी केलेली नव्हती, अशांच्या खात्यावर हप्ता न पडल्याने आता मागील हप्ता व आताचा Pm Kisan 14th Installment त्यांच्या खात्यावर एकत्र येणार आहे.
पी एम किसान योजनेचा हप्ता एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर होईल जमा
पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता 8.5 करोड रुपयाचा हप्ता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, व हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर dbt च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.
या तारखेला मिळेल चौदावा हप्ता:
28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता Pm Kisan 14th Installment वितरित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारा हप्ता वितरित केल्या जाणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती.