शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना जाहीर केलेली आहे, व या सूचनांद्वारा मागील त्याला शेततळे व मागील त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असेल अशा प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशा प्रकारची सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे तसेच एकनाथ डवले कृषी आयुक्त सुनील चव्हाण तसेच इतरही संचालक उपस्थित असताना झालेल्या बैठकीमध्ये Shetkari Yojana ची ही महत्वपूर्ण अशी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णय राज्य शासना अंतर्गत आतापर्यंत सुद्धा घेण्यात आलेले आहे त्यामध्ये एक रुपयांमध्ये पिक विमा असो अथवा नमो शेतकरी महासंघ निधी योजना अशा प्रकारच्या महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहेत व या योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सुद्धा आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे.
मागेल त्याला शेततळे व मागील त्याला ठिबक सिंचन संच यासाठी करण्यात येणारी अर्ज प्रक्रिया सुद्धा कमी कालावधीची करण्यात यावी व त्यामध्ये स्पष्टता व सोपेपणा यावा अशा सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या, व या अंतर्गत निघणारी लॉटरी बंद व्हायला हवी असे कृषिमंत्री म्हणाले. म्हणजेच मागील त्याला योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया चा कालावधी कमी करण्यात येऊन अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला योजनेचा लाभ देण्यात यावा असे ते म्हणाले.
यावर्षीची राज्यातील पावसाची परिस्थिती नुसार अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संघ येऊन पडलेले आहे व याच कारणाने तालुका निहाय दुबार पेरणीचा अहवाल तयार ठेवण्यात यावा असे कृषिमंत्र्यांनी सांगितले, व राज्यामध्ये उत्पन्नात दरडोईप्रमाणे वाढ व्हावी, व अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचा मनोदय धनंजय मुंडे यांनी मांडला. तसेच शेती विषयक अनेक विषयांवर चर्चा करण्यात आलेली होती.
राज्यामध्ये एक रुपया मध्ये पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच राज्य शासन अंतर्गत राबविण्यात येणारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे सहा व राज्य सरकारचे सहा हजार याप्रमाणे एकूण बारा हजार रुपयांचा वार्षिक लाभ मिळणार आहे. यासोबतच कृषी विभागा अंतर्गत एकूण 13 योजना 100% केंद्र पुरस्कृत प्रमाणे राबवण्यात येत असतात व या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा याकरिता लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा असे सुद्धा चर्चेमध्ये सांगितलं गेलं.
Shetkari Yojana: खुशखर, आता सर्व शेतकरी योजनांचे अर्ज करा मोबाईल ॲप वरून, नवीन ॲप लॉन्च