शेतकरी मित्रांनो राज्य शासन तसेच केंद्र शासन राज्यातील तसेच देशातील सर्व शेतकरी बांधवांना त्यांची दुप्पट होण्यासाठी विविध प्रकारच्या योजना तसेच उपक्रम हाती घेऊन प्रयत्न करत आहे. जर शेतकऱ्यांना लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर फळबाग लागवड करून होता येते. इतर पिकांच्या तुलनेत फळबाग चांगले उत्पन्न देत असून राज्यात तसेच देशात फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यासाठी राज्य शासन फळबाग लागवड योजनेला प्रोत्साहन देत असून त्याकरिता Falbag Lagwad Yojana Anudan देखील देते.
फळबाग लागवड योजना शंभर टक्के अनुदानावर राबविण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबागाची लागवड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही संपूर्ण खर्च शासन करणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला मंजुरी Bhusaheb Fundkar Falbag Lagwad Yojana:
आपल्या राज्यात फळबाग लागवड करण्यासाठी दोन प्रकारच्या योजना आहेत. फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान देणारी पहिली योजना म्हणजे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, परंतु अनेक शेतकरी मनरेगा च्या काही निकषामुळे योजनेअंतर्गत लाभ मिळू शकत नाही त्यामुळे राज्यांमध्ये नवीन योजना राबवण्यात येते ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना होय.
योजने अंतर्गत अनुदान किती मिळते? Falbag Lagwad Anudan:
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते म्हणजेच लागवड करण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च शासन देते.
सन 2023 24 मध्ये योजना राबवण्यासाठी मंजुरी:
ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023 24 मध्ये राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली असेल त्याबाबतचा शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून 102 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
योजनेअंतर्गत लाभ कोण मिळवू शकतो?
योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी अर्ज करून लाभ मिळवू शकतो.
अर्ज कसा करायचा? How to Apply For Falbag Anudan Yojana?
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये महाडीबीटी पोर्टल हा शब्द टाकून येणाऱ्या पहिल्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करा.