28 जून 2023, बुधवारी झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेले आहे, 2023-24 हंगामा करिता उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीमध्ये दहा रुपये एफ आर पी प्रतिक्विंटल मागे वाढ करण्यात आलेली आहे, व या वाढी मुळे आता FRP 315 रुपये प्रति क्विंटल असणार आहे.
त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याच प्रमाणे कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना याचा चांगलाच लाभ होणार आहे,त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एफ आर पी 305 रुपये होती, तर आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून 315 रुपये झालेली आहे. त्याचबरोबर 2014 15 च्या हंगामामध्ये एफ आर पी 210 रुपये होती, व काही वर्षांपासूनच यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. व आता सध्या 2023 मध्ये करण्यात आलेल्या एफ आर पी मध्ये वाढ यामुळे कामगारांना तसेच उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.
त्याचप्रमाणे ऊस हे देशातील दोन नंबरचे पीक आहे, आता त्यामध्ये साखर हंगाम 2019 साठी दहा पॉईंट पंचवीस टक्के वसुली दरवर आधारित 157 रुपये प्रतिक्विंटल आहे. त्याचबरोबर अनुराग ठाकूर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले यंदाच्या चालू साखर हंगामामध्ये ऊस खरेदी 1,11,366 कोटी,3,353 टन केला आहे. त्याचबरोबर OMCs 20,500 कोटी रुपयांचा महसूल च्या विक्री मधून मिळवला आहे.