शेतकरी घडलेल्या शेतमाल फळ नाशिवंत शेतमाल यांच्यावर प्रक्रिया करून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी तरुणांना तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळत असून या योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंत देखील प्रोत्साहन मिळवता येते. या PMFME Scheme 2023 चा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच उद्योजक घेऊ शकतात.
काय आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना:
मित्रांनो केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असून प्रत्येक जिल्हास्तरावर एक अन्नप्रक्रिया उद्योग तयार व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच अर्जदारांना शेतमाल तसेच फळ व नाशिवंत घटकावर प्रक्रिया करून स्वतःचा उद्योग स्थापन करण्यासाठी अनुदान देण्यात येते. या PMFME Scheme अंतर्गत 30 ते 35 टक्केपर्यंत अनुदान मिळते.
योजनेअंतर्गत समाविष्ट असणारे जिल्हे:
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनाही महाराष्ट्र राज्यातील सर्वच म्हणजे 36 पैकी 36 जिल्ह्यात राबविण्यात येत असून मुंबई नगर तसेच मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत जिल्ह्याची कोणतीही अट नसून लाभार्थ्यांची पात्रता खाली जाणून घेऊया.
लाभार्थी पात्रता:
1. वैयक्तिक लाभार्थी
2. शेतकरी गट
3. भागीदारी संस्था
4. बेरोजगार युवक
5. भागीदारी संस्था
अटी व शर्ती:
1. अर्जदाराच्या उद्योगांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असावे
2. अर्जदार हा किमान आठवी उत्तीर्ण असावा.
3. अर्ज दाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे
4. कंपनीची उलाढाल किमान एक कोटी रुपये इतकी असावी.
अर्ज कसा करायचा? How to Apply For PMFME Scheme?
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागेल. योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे त्यामुळे कोणतेही शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या प्रकल्पांना मिळेल लाभ:
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही प्रक्रियेवर आधारित उद्योग योजना असून या योजनेअंतर्गत भाजीपाला फळ पिके तसेच नाशवंत पिके, तृणधान्य तसेच कडधान्य तसेच तेलबिया, मसाला पिके, दुग्ध व्यवसाय तसेच मत्स्योत्पादन तसेच किरकोळ वन उत्पादने तसेच या व्यतिरिक्त ही इतर प्रक्रिया उद्योग यांचा समावेश आहे. त्यामुळे वरील कोणत्याही बाबी करता तुम्ही या PMFME Yojana योजने अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकता.