Ayushman Card: 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळवून देणारे हे कार्ड तुम्ही काढले का? नसेल तर, लगेच हे आयुष्यमान कार्ड काढा

देशातील केंद्रीय सरकारने म्हणजेच मोदी सरकारने देशातील गरीब लोकांसाठी अनेक प्रकारच्या जनकल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने देशातील प्रत्येक गरीब कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे आरोग्याच्या समस्या असू नये, जर एखाद्याला एखाद्या गंभीर आजार असेल तर त्यावर त्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला मोफत उपचार मिळवता यावा, या Ayushman Card साठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू आहे.

 

या योजनेच्या माध्यमातून योजनेच्या लाभार्थ्यांना एक कार्ड उपलब्ध करून देण्यात येते यावर विशिष्ट प्रकारचा क्रमांक असतो तसेच बारकोड असतो ज्याच्या माध्यमातून तो कार्डधारक मोठ्या गंभीर आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळवू शकतो. एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीवर गंभीर आजार आला तर त्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार मिळवण्यासाठी पैसे नसतात. परंतु अशा वेळेस त्या गरीब कुटुंबाला ही Ayushman Card योजना जीवनदायी ठरते.

 

केंद्र शासनाने देशातील गरीब व्यक्तींसाठी त्यामध्ये त्यांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध योजना तसेच शिक्षण देणाऱ्या विविध योजना त्याचबरोबर रेशन धान्याचे योजना, गरीब कुटुंबातील व्यक्तींना वृद्ध काळामध्ये पेन्शन देणारी योजना, गरिबांना अतिशय कमी किमतीमध्ये विम्याचे कवच उपलब्ध करून देणारी योजना तसेच गरिबांना घर देणाऱ्या योजना त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कल्याणकारी योजना देशांमध्ये सुरू आहे.

 

5 लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार देणारी योजना कोणती? Ayushman Card Yojana:

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाची योजना या योजनेला आयुष्यमान कार्ड योजना नावाने सुद्धा ओळखले जाते. योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही दवाखान्यात जाऊन करता येतो.

 

 

योजने अंतर्गत आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार देणारे pmjay card काढण्यासाठी तुम्ही एक तर घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर वरून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या pmjay.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का ते चेक करू शकतात.

Gay Palan: दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या गाई कोणत्या? या आहेत देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

किंवा तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन योजनेअंतर्गत पात्र आहात का ते पाहून जर पात्र असाल तर लगेच हे कार्ड काढू शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रामध्ये तुमचे आधार कार्ड घेऊन जावे लागेल.

Maharain Portel: आपल्या गावात, तालुक्यात दररोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी पहा ऑनलाईन, असे पहा तुमच्या भागात किती पाऊस पडला

त्यानंतर तुम्हाला योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार देणारे कार्ड त्याच ठिकाणी मिळेल.