संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ कर्ज योजना, रु 5 लाख अर्थसहाय्य, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | LIDCOM schemes 2023 Maharashtra

मित्रांनो केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्फत समाजाच्या विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. समाजाच्या विविध घटकांना विविध क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे. यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध महामंडळ तयार करून त्या समाजाचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील आहे. चर्मकार समाजातील बांधवांना त्यांचा विकास होण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या LIDCOM schemes 2023 मार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो.

या Sant Rohidas Charmodyog & Charmakar Vikas Mahamandal योजना अंतर्गत विविध प्रकारच्या अनुदान देणाऱ्या व अर्थसहाय्य पुरवण्यात तसेच कर्ज देणाऱ्या योजना राबविण्यात येतात. या महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना LIDCOM schemes संदर्भात संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

 

खालील 2 योजना राबविण्यात येतात:

1. बीज भांडवल योजना(50000 के 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज त्यावर 50 टक्के अर्थ सहाय्य)

2. 50 टक्के अनुदान योजना

 

योजनेच्या अटी:

या संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ अंतर्गत अनुसूचित जातीतील चर्मकार समाज व त्या अंतर्गत येणाऱ्या पोट जातीतील व्यक्तींना लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी प्रवर्गांना लाभ मिळतो.

या Sant Rohidas Charmodyog & Charmakar Vikas Mahamandal या माध्यमातून या समाजातील व्यक्तींना शैक्षणिक दृष्ट्या साक्षर करणे तसेच त्यांचा सामाजिक विकास करणे विविध व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांना उद्योजक तसेच व्यावसायिक बनवणे इत्यादीसाठी प्रयत्न करण्यात येत असतात.

 

 

योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा?

हे महामंडळ चर्मकार समाजातील व्यक्तींच्या आर्थिक सामाजिक तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य करत असून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज करायचा असतो. तसेच योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे कागदपत्रे जिल्हा महामंडळाच्या कार्यालयात सादर करायचे असतात.

 

योजने संदर्भात संपूर्ण माहिती येथे पहा

 

योजनेअंतर्गत महामंडळाचे जिल्हास्तरावर कार्यालय असून लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रियांची माहिती तसेच अर्ज करण्यासाठी या कार्यालयात संपूर्ण मदत करण्यात येते.

 

या LIDCOM schemes अंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

योजनेअंतर्गत नियम व अटी:

1. संबंधित अर्जदार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील असावा.

2. वयोमर्यादा ही 18 ते 60 वर्षे इतकी आहे.

3. अर्जदाराला ज्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे त्या व्यवसायाबद्दल ज्ञान असायला पाहिजे.

4. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

5. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळवलेला नसावा.

6. अर्जदार चर्मकार समाजातील असल्याबाबत जातीचा दाखला त्याच्याकडे असावा.

 

या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे यांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

योजने संदर्भात विस्तृत माहिती पाहण्यासाठी तसेच अर्जाचा नमुना पाहण्यासाठी तुम्ही वरील लिंक वरून संपूर्ण माहिती पाहू शकतात. ही माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा.