शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला लाख रुपये कर्ज मिळते. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वर अल्प मुदती कर्ज दिले जाते. हे कर्ज तुम्हाला बँका देतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकाचे उत्पादन घेण्यासाठी तसेच शेती उपयोगी विविध खर्च करिता पैशाची आवश्यकता भासते. त्यामुळे अशा वेळेस शेतकऱ्यांना किसान क्रेडिट (KCC Card) कार्ड मदत करते.
किसान क्रेडिट कार्ड हे केवळ शेतकऱ्यांसाठी बनवण्यात येत असून शासनाद्वारे Kisan Credit Card सुरू करण्यात आलेले होते, हे कार्ड तुम्ही बँकेतून मिळवू शकतात. केंद्र तसेच राज्य सरकार वेळोवेळी देशातील शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट विविध योजना राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना अल्प मुदती पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने KCC Card लॉन्च केले होते.
किसान क्रेडिट कार्ड कोण पूरविते?
किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना सरकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका तसेच सहकारी बँका पुरवितात. हे कार्ड तुम्ही बँकेत जाऊन मिळवू शकतात.
किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती:
किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात नाबार्ड बँकेने केलेली असून 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड अमलात आले होते. किसान क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी असून शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असताना अल्प मुदती कर्ज उपलब्ध होते. 18 ते 75 वयोगट असणारा कोणताही शेतकरी अर्ज करू शकतो. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकरी तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळवू शकतात.
लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for KCC:
तुम्हाला सुद्धा किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची कर्ज मिळवायचे असेल तर सुरुवातीला किसान क्रेडिट कार्ड काढावे लागेल. किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.
1. आधार कार्ड
2. जमिनीची कागदपत्रे
3. इतर कागदपत्र (बँकेने नमूद केलेली)
लाखो रुपये लोन मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? How to Apply for KCC?
शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करता येतो. किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा ते तुमच्या बँकेवर अवलंबून असते. एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. प्रत्येक बँक ऑफलाईन पद्धतीने किसान क्रेडिट कार्डचा अर्ज स्वीकारते, परंतु प्रत्येक बँक ऑनलाईन किसान क्रेडिट कार्डचा अर्ज ऑनलाइन स्वीकारत नाही.
आता स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये लोन; असा करा अर्ज
आपले प्रतिनिधी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या बँकेच्या शाखेत जा, किती तुम्हाला किसान क्रेडिट ता अर्ज मिळेल तो भरून आवश्यक ते कागदपत्र देऊन जमा करा. तुम्ही केलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँक तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड देते.
मागेल त्याला बीबीएफ पेरणी यंत्र; अनुदानावर पेरणी यंत्र मिळवण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज