देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. शेतकरी बंधूंनो iffco कंपनीने लॉन्च केलेले नॅनो डीपी हे आता बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले असून शेतकऱ्यांना केवळ अर्ध्या किमतीमध्ये आता डीएपी मिळणार आहे. राज्यातील तसेच देशातील सर्वच कृषी सेवा केंद्रांमध्ये नॅनो डीएपी उपलब्ध झालेले असून शेतकऱ्यांना केवळ पूर्वीपेक्षा आता अर्धी किंमत देऊन लिक्विडमध्ये Nano DAP मिळणार आहे.
डीएपी मिळवा आता अर्ध्यापेक्षा कमी किमतीत:
आपल्या देशात जगातील सर्वात महत्त्वाचा आविष्कार करण्यात आलेला असून इफको कंपनीने जगात सर्वात पहिल्यांदा लिक्विड स्वरूपात डीएपी लॉंच केलेले आहे. त्यामुळे हे डीएपीचा नॅनो प्रकार असून अतिशय स्वस्त डीएपी उपलब्ध होत आहे. पूर्वी डीएपी या रासायनिक खताच्या एका बाजूला बाराशे ते सोळाशे रुपये पर्यंत रक्कम मोजावी लागत होती, परंतु लिक्विड स्वरूपातील हे Nano DAP अर्ध्या किमतीत मिळणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 26 एप्रिल 2023 रोजी नॅनो डीएपी चे उद्घाटन केलेली होती. त्यानंतर आता या नॅनो डीएपी च्या वापराला परवानगी मिळालेली असून हे खत आता बाजारामध्ये देखील उपलब्ध झालेले आहे. सध्या नॅनो डीएपी हे खत दाणेदार खतांच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
नॅनो डीएपी चे हे आहेत फायदे Benifits of Nano DAP
मित्रांनो देशात नॅनो डीएपी हे लॉन्च झालेले असून ते अतिशय फायदेशीर असणार आहे. नॅनो डीएपी चे शेतकऱ्यांना तसेच पर्यावरणाला खालील फायदे होते.
1. उत्पन्नाचा दर्जा तसेच उत्पादन वाढणार
2. जमिनीचा पोत सुधारेल.
3. जमीन रसायनमुक्त होईल
4. थेट जमिनीत रसायनिक खत न केल्यामुळे जमिनीची धूप तसेच दर्जा घालवणार नाही.
5. नॅनो डीएपी लिक्विड स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये न टाकता याची फवारणी करता येते.
6. नॅनो डीएपी ची वाहतूक आणि साठवणूक करणे सोपे आहे.
किती रुपयात मिळेल नॅनो डीएपी:
इफको नॅनो डीएपी (लिक्विड) ची 500 मिली ची एक बाटली 45 किलोग्रॅम ग्रॅन्युलर डीएपी इतकी आहे. त्यामुळे तुम्ही एक बॅग दाणेदार डीएपी टाकण्याऐवजी 500 मिली नॅनो डीएपी ची फवारणी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला अर्ध्या लिटरच्या नॅनो डीएपी बॉटलमध्ये डीएपी एका पोत्याइतकीच वापर करता येईल.
नॅनो डीएपी च दर हा 600 रुपये प्रति बॉटल इतका आहे. त्यामुळे जर तुम्ही दाणेदार स्वरूपातील डीएपी ची बॅग घेतली तर ते तुम्हाला बाराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पडेल. परंतु नॅनो डीएपी हे केवळ 600 रुपयाला म्हणजेच अर्ध्या किमतीला पडेल.
अश्या प्रकारे आता शेतकऱ्यांना नॅनो डीएपी हे अतिशय कमी दरात उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करून लाभ मिळवावा.