मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात त्याचप्रमाणे देशात सुद्धा लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातून लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा रोग नियंत्रण आणण्याकरिता निधीची तरतूद करण्यात येत आहे. लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य शासनाच्या वतीने मदत जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जाहीर केलेल्या निधीबद्दल माहिती तसेच लम्पी रोगामुळे तुमच्या जनावराचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई करिता करावयाची अर्जाची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Lampi Virus Nuksan Bharpai
लंपी नुकसान भरपाई मिळण्याकरिता असा करा अर्ज | Lampy Nuksan Bharpai Maharashtra |
मित्रांनो लम्पी(Lumpy Virus) हा रोग संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. हा जनावरांच्या त्वचेवर होणारा रोग आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीमध्ये लम्पी या रोगाच्या प्रादुर्भावामुळे एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.
लम्पी नुकसान भरपाई मदत Lumpy Nuksan Bharpai Maharashtra
Lampi Virus चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांची मदत देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती ही मदत जिल्ह्याला पुरवणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या जनावराचा या आजार मुळे मृत्यू झाल्यास त्यांना राज्य शासन नुकसान भरपाई देणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणा मधील जे निकष आहेत त्या निकषानुसार ही भरपाई देण्यात येणार आहे. Lampi Nuksan Bharpai Nidhi
हे नक्की वाचा:- घरकुल योजना यादी 2022 जाहीर; अशी करा डाऊनलोड
लंपी मुळे जनावराचा मृत्यू झाल्यास एवढी मिळणार नुकसान भरपाई:-
1 दुधाळ जनावरे (गाय) 30,000 रुपये नुकसान भरपाई
2 ओढकाम करणारी जनावरे (बैल) 25,000 रुपये नुकसान भरपाई
3 वासरासाठी 16,000 रुपये नुकसान भरपाई
लम्पी नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Lampi Nuksan Bharpai Maharashtra
1. ग्रामीण भागातील रहिवाशांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यास
2. महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांच्या जनावरांचा मृत्यू झाला
3. नगरपंचायत तसेच नगरपरिषद हद्दीतील रहिवाशांच्या जनावरांचा मृत्यू झाला
4. नगरपालिका तसेच कटक मंडळे हद्दीतील रहिवाशांच्या जनावरांचा मृत्यू झाला
इत्यादी शेतकऱ्यांच्या तसेच रहिवाशांच्या जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झालेला असेल तर ते लम्पी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
लम्पी आजार नुकसान भरपाई कशी मिळणार? How to get Lumpy Nuksan Bharpai?
जर तुमच्या जनावरांचा लम्पी आजारामुळे मृत्यू झालेला असेल तर तुम्हाला जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन तुमच्या लम्पी आजारामुळे मृत झालेल्या जनावराचा पंचनामा करून घ्यायचा आहे. किंवा नदीच्या दवाखान्यात माहिती द्यायची आहे आज किंवा ऑनलाईन लम्पी आजार नुकसान भरपाई चा अर्ज भरायचा आहे. Lampy Nuksan Bharpai
लम्पी नुकसान भरपाई करिता अर्ज कसा करायचा? How to apply for lumpy nuksan bharpai maharashtra :-
लम्पी आजारामुळे तुमच्या जनावरांचा मृत्यू झालेला असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने लम्पी Lampy Nuksan Bharpai Maharashtra करण्याकरिता पोर्टल ठरवून दिलेले आहे.
1. सर्वप्रथम लम्पी नुकसान भरपाई अर्ज करण्याचे वेबसाईटवर जा.
2. लंपी नुकसान भरपाई अर्ज करण्याची वेबसाईट येथे पहा–
3. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
4. नोंदणी करताना विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणी करून घ्या.
5. आता अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लॉगिन करायचे आहे.
6. तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड च्या माध्यमातून लॉगिन करून घ्या.
7. आणि ऑनलाईन अर्ज सादर करा.