मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पीएम दक्ष योजना काय आहे(What is PM Daksh Yojana? पी एम दक्ष योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा How to Apply under PM Daksh Yojana? पी एम दक्ष योजनेचा उद्देश, पी एम दक्ष योजना वैशिष्ट्ये, पी एम दक्ष योजना कागदपत्रे Documents for PM Daksh Yojana या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे PM Daksh Yojana Information Marathi करिता ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
पी एम दक्ष योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया | PM Daksh Yojana Information Marathi |
पी एम दक्ष योजना काय आहे? What is PM Daksh Yojana
PM Daksh Yojana ही एक केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. पीएम दक्ष योजना अंतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण हे देण्यात येत असते. PM-DAKSH (प्रधानमंत्री दक्षता और कुशलता संपन हिताग्रही योजना) अंतर्गत SC, OBC, EBCs, DNTs आणि स्वच्छता कामगारांना विविध कौशल्य पुरवणारी त्याचप्रमाणे ट्रेनिंग स्कॉलरशिप देणारी एक राष्ट्रीयकृत योजना आहे. पीएम दक्ष योजना ची सुरुवात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. या PM Daksh Yojana अंतर्गत अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्ग आणि सफाई कर्मचारी यांना रोजगार च्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता प्रशिक्षण देण्यात येत आहे. योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आलेली होती. या योजने करता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.PM Daksh Yojana in Marathi
हे नक्की वाचा:- बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी कशी करायची?
PM Daksh Yojana अंतर्गत पात्र प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध कौशल्य प्राप्त करण्याकरिता त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता खालील बाबींमध्ये प्रशिक्षण हे देण्यात येत असते. या योजनेची अंमलबजावणी ही केंद्र सरकार करीत आहे.
1. अप-स्किलिंग/री-स्किलिंग
2. उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी)
3. अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम
4. दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम
वरील चार बाबींमध्ये केंद्र सरकारच्या या पीएम दक्ष योजने अंतर्गत (Pm Daksh Yojana Mahiti Marathi) प्रशिक्षण हे देण्यात येत असते. आणि त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार च्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असतात.
पी एम दक्ष योजना करिता पात्रता Eligibility for PM Daksh Yojana
पीएम दक्ष योजना अंतर्गत येण्याकरिता उमेदवार हा 18 ते 45 या वयोगटातील असावा लागतो. त्याचप्रमाणे pm daksh yojana अंतर्गत अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्ग आणि सफाई कर्मचारी यांना लाभ घेता येतो. PM DAKSH YOJANA अंतर्गत लाभ घेण्याकरिता जात प्रमाणपत्र असावे लागते. इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी उमेदवारांची वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी लागते. निमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती करिता उत्पन्नाचा कोणताही निकष लागू होत नाही. तसेच सफाई कामगार यांना सुद्धा उत्पन्नाची मर्यादा नाही. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या व्यक्तींची उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असावी लागते. PM Daksh Yojana Information Marathi
पी एम दक्ष योजना वैशिष्ट्ये (Features of PM Daksh Scheme)
1. पीएम दक्ष योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र हे प्रदान करण्यात येत असते.
2. पीएम दक्षिण योजना अंतर्गत उमेदवारांची प्रशिक्षण पूर्ण झालेली आहे आणि मूल्यांकन सुद्धा झालेले आहे अशा उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. म्हणजेच प्लेसमेंट दिली जाते.
3. पीएम दक्ष योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
4. पीएम दक्ष योजनेअंतर्गत जे उमेदवार अल्पकालीन तसेच दीर्घकालीन प्रशिक्षण पूर्ण करतात आणि त्यांची उपस्थिती ही 80 टक्के पेक्षा जास्त असते अशा उमेदवारांना दरमहा रुपये 1000 ते 1500 पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असते.
5. वर दर्शवलेल्या चारही बाबींकरिता शिष्यवृत्ती ही वेगवेगळ्या निकषानुसार देण्यात येत आहे.
6. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा याकरिता पीएम दक्ष पोर्टल तसेच पीएम दक्ष मोबाईल ॲप्लिकेशन ची सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे.
पीएम दक्ष योजना करिता आवश्यक बाबी
पीएम दक्ष योजना अंतर्गत जर ईबीसी प्रवर्गातील उमेदवारास लाभ घ्यायचा असेल तर ईबीसी प्रवर्गातील उमेदवाराकडे त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे रुपये एक लाखांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक आहे. PM Daksh Yojana Information Marathi. तसेच ebc प्रवर्गातील उमेदवारांकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक नाही. सफाई कर्मचारी यांना या पीएम दक्ष योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता आवश्यक त्या प्राधिकरणाने दिलेले व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक आहे.
हे नक्की वाचा:- पोस्ट ऑफिस नवीन 299 आणि 399 रुपयात 10 लाख रुपये अपघात विमा योजना
प्रधानमंत्री दक्ष योजना अर्ज प्रक्रिया(PM Daksh Yojana Application Process)
पीएम दक्ष योजना अंतर्गत जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर खालील दर्शविल्याप्रमाणे तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे.
pm daksh yojana अंतर्गत प्रशिक्षण घेण्याकरिता उमेदवारांना पीएम दक्ष योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. या PM DAKSH YOJANA करिता पोर्टल सुद्धा लाँच करण्यात आलेली आहे. पीएम दक्ष योजना करिता तुम्हाला अधिक माहिती जर मिळवायची असेल तर तुम्ही पीएम दक्ष योजना च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
पीएम दक्ष योजना हेल्पलाईन क्रमांक :- 1800110396
पीएम दक्ष योजना ईमेल आयडी:-
1. nsfdcskill@gmail.com
2. support-nsfdc@nic.in
अधिकृत संकेतस्थळ:- इथे क्लिक करा
नोंदणी करण्याकरिता:- इथे क्लिक करा
पीएम दक्ष योजना चा उद्देश Objectives of Pm Daksh Yojana
योजना अंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये 2.7 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत महिला घर कामाबरोबरच प्रशिक्षण घेऊन विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वयंरोजगार प्राप्त करू शकतात. या योजने अंतर्गत तरुण प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवून तसेच विशेष कौशल्य प्राप्त करून या स्पर्धेच्या युगात स्वतःला चांगले स्थान मिळवून देऊ शकतात.