Cryptocurrency म्हणजे काय आहे? क्रिप्टोकरन्सी चे फायदे, तोटे आणि प्रकार किती आहेत?| Cryptocurrency Information In Marathi

 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग अशा टॉपिक विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या या पोस्टमध्ये क्रिप्टोकरन्सी काय आहे? What is cryptocurrency? त्याच प्रमाणे क्रिप्टोकरन्सी चे प्रकार किती आहेत?What are the types of cryptocurrency? याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो दिवसेंदिवस क्रिप्टो करेंसी ही लोकप्रिय होत आहे. Cryptocurrency चा वापर आता आपल्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला क्रिप्टो करेंसी बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. Cryptocurrency Information In Marathi क्रिप्टोकरन्सी माहिती मराठी

 

 

Cryptocurrency म्हणजे काय आहे? क्रिप्टोकरन्सी चे फायदे, तोटे आणि प्रकार किती आहेत?| Cryptocurrency Information In Marathi क्रिप्टोकरन्सी माहिती मराठी
Cryptocurrency म्हणजे काय आहे? क्रिप्टोकरन्सी चे फायदे, तोटे आणि प्रकार किती आहेत?| Cryptocurrency Information In Marathi

 

 

Table of Contents

 

मित्रांनो आजचे युग डिजिटल युग आहे. आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाइन पद्धतीने होत आहे. पूर्वी आपण पैसे काढण्यासाठी तसेच बँकेमध्ये पैसे टाकण्यासाठी इतरांना पैसे पाठवण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करीत होतो. परंतु आता आपण प्रत्येक व्यवहार घरबसल्या मोबाईलच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने करीत आहोत. अशी अनेक ऑनलाईन एप्लीकेशन आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करीत आहोत. जसे की, फोन पे , गुगल पे , ॲमेझॉन पे , पेटीएम इत्यादी. Cryptocurrency Information In Marathi, Cryptocurrency Mahiti Marathi आपण जाणून घेत आहोत.

 

 

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट काय आहे? संपूर्ण माहिती

 

 

परंतु आता आजच्या या नवीन युगाच्या काळात यापेक्षाही नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. आता आपण cryptocurrency च्या साह्याने व्यवहार करू शकतो. असे मानले जाते की भविष्यात आपण वापरत असलेल्या चलना ऐवजी क्रिप्टो करेंसी म्हणजेच आभासी चलन चा उपयोग हा वाढणार आहे. मित्रांनो cryptocurrency हे एक आभासी चलन आहे. प्रत्येक देशाकडे आपापले चलन आहे. त्या चलनाच्या आधारे आपण त्या त्या देशात आर्थिक व्यवहार करीत असतो. जसे की आपल्या भारत देशाचे चलन हे भारतीय रुपया आहे. अमेरिकेचे चलन हे अमेरिकन डॉलर आहे. आणि या चलनाला सरकारची मान्यता असते. आपल्या देशात भारतीय रिझर्व बँक चलनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असते.

 

 

आपल्या देशात असणाऱ्या चलनाप्रमाणेच क्रिप्टोकरन्सी हे सुद्धा एक चलनच आहे. परंतु हे चलन आभासी चलन आहे. या चलनाला म्हणजे क्रिप्टोकरन्सी ला आपण पाहू शकत नाही त्याचप्रमाणे स्पर्श सुद्धा करू शकत नाही. हे चलन आभासी चलन असल्यामुळे हे चलन आपल्याला आपल्या जवळ खिशात घेऊन फिरण्याची गरज पडत नाही. दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सी चे क्रेझ हे वाढतच आहे. Cryptocurrency Mahiti Marathi

 

Cryptocurrency म्हणजे काय आहे? क्रिप्टोकरन्सी चे फायदे, तोटे आणि प्रकार किती आहेत?| Cryptocurrency Information In Marathi

 

 

 

Cryptocurrency म्हणजे काय आहे? (What is Cryptocurrency) :-

 

क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे. Cryptocurrency हे एक कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही सरकारची किंवा कोणत्याही बँकेची मालकी नसलेले स्वतंत्र असे चलन आहे. त्याचप्रमाणे या क्रिप्टोकरन्सी वर कोणाचेही नियंत्रण असते. ही Cryptocurrency मोठमोठ्या संगणकाचा वापर करून तयार करण्यात आलेली असते. क्रिप्टो चलन बनवण्याच्या प्रोसेस ला क्रिप्टो मायनिंग असे म्हणतात. Crypto currency म्हणजेच आभासी चलन बनवण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करण्यात येत असते. Cryptocurrency information in marathi

 

 

हे नक्की वाचा:- Mutual Fund म्हणजे काय? संपूर्ण माहिती 

 

या क्रिप्टोकरन्सी चा वापर करून आपण जगामध्ये कुठेही हे आभासी चलन ट्रान्सफर करू शकतो. तसेच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून आपण हे crypto मिळवू शकतो. जर एखाद्या दुकानांमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर या आभासी चलनाचा स्वीकार होत असेल. तर आपण त्या ठिकाणी आभासी चलन त्यांना पे करून त्या ठिकाणाहून वस्तू खरेदी करू शकतो. आभासी चलनाचा महत्त्वाचा प्रकार बिटकॉइन हा 2009 मध्ये तयार करण्यात आला होता. बिटकॉइन हे जगातील पहिले आभासी चलन आहे.  तेव्हापासून बिटकॉइनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सी चे महत्व सुद्धा वाढले आहेत. जर प्रत्येक देशाने या आभासी चलनाचा स्वीकार करण्यास सुरुवात केल्यास भविष्यात या cryptocurrency ला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व येऊ शकते.cryptocurrency meaning in Marathi

 

 

हे नक्की वाचा:- शेअर बाजार आणि म्युचुअल फंड यामधील फरक काय?

 

Cryptocurrency हे खूप मोठ्या प्रमाणात Volatile अस्थिर असते. या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करणे खूप जास्त रिक्सी समजण्यात येते. या आभासी चलनाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत असतात. त्यामुळे या cryptocurrency मधील काही कॉइन असे आहेत की ज्यांनी दोन दोन हजार पटीने रिटर्न दिलेले आहे. आणि त्याच प्रमाणात त्या कमी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे या चलनामध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे सुद्धा मानण्यात येते. क्रिप्टोकरन्सी हे पिअर टू पिअर इलेक्ट्रॉनिक” (PEER TO PEER Electronic) पद्धतीने कार्य करत असते.

 

 

 

क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत? Types Of Cryptocurrency In Marathi:-

 

1. बिटकॉइन (Bitcoin)

2. लिटकॉइन (Litecoin)

3. एथेरियम (Ethereum)

4. रिपल (Ripple)

5. बिटकॉइन कॅश (Bitcoin Cash)

6. झेकॅश (Zcash)

7. मोनेरो (Monero)

8. स्टेल्लर (Stellar)

 

 

 

क्रिप्टोकरन्सीचे फायदे (Benefits of Cryptocurrency):-

 

1. क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे.

2. हे ब्लॉक चेन वर आधारित कार्य करत असल्यामुळे या मध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत

3. व्यवहार करताना transaction फी ही खूप कमी राहते.

4. व्यवहारावर बंधने नाहीत.

5. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता .

6. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू शकतो.

 

 

हे नक्की वाचा:- Demat Account काय आहे? संपूर्ण माहिती 

 

क्रिप्टोकरन्सीचे तोटे (Disadvantages of cryptocurrency):-

 

1. cryptocurrency वर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्या सोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही.

2. cryptocurrency मध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे.

3. क्रिप्टोकरन्सी मध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही.

4. ही currency खूप जास्त अस्थिर आहे. cryptocurrency चा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो.

5. cryptocurrency याचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की यावर कोणाचेही नियंत्रण नसते.

 

 

मित्रांनो आशा करतो की, cryptocurrency विषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा. आम्ही नक्कीच तुमच्या शंकांचे निरसन करू. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.