राज्यामध्ये लेक लाडकी योजनेस मंजुरी, मुलींना मिळणार 1 लाख रुपये, महत्वाचा निर्णय | Lek Ladki Yojana

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह अजित पवार व देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते.

राज्यातील मुलींसाठी लेक लाडकी योजना चालू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला असून यापूर्वी लेक लडकी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत लेक लाडकी योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय:

झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर हे नाव औरंगाबाद विद्यापीठाच्या ऐवजी ठेवण्यासंबंधी मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजी नगर विद्यापीठ अशा प्रकारचे नाव असणार आहे.

सार्वजनिक भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण आणि खासगी जलविद्युत मध्ये करण्यात येईल, तसेच माजी खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरापेक्षा कमी जमीन मिळणार, व नागपुर या ठिकाणी भोसला मिलिटरी स्कूलला जमीन देण्यात येईल.

लेक लाडकी योजना संदर्भात संपूर्ण माहिती येथे पहा

सांगली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र करण्यात येईल, ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा फलटण ते पंढरपूर करण्यात येण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे.अशाप्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती सह महत्त्वपूर्ण अशे निर्णय घेण्यात आलेला आहे.