तलाठी भरतीची परीक्षा राज्यातील अनेक उमेदवारांनी दिलेली होती, व त्याबाबतच आता उमेदवारांना त्यांची उत्तर पत्रिका ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व त्यानुसार त्यांना उत्तर पत्रिका चेक करता येणार आहे.
उमेदवारांना उत्तर पत्रिका चेक केल्यानंतर जर कोणत्या प्रकारचे आक्षेप असेल तर त्यांना टीसीएस कंपनीकडे त्यांचे आक्षेप नोंदविता येणार आहे. तलाठी भरती ची परीक्षा अनेक उमेदवारांनी दिली होती व अशा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपली उत्तर पत्रिका ही 28 सप्टेंबर पासून ते 8 ऑक्टोंबर या तारखेदरम्यान बघता येईल.
उमेदवारांना कशा प्रकारचे आक्षेप असल्यास त्यांना शंभर रुपये शुल्क देऊन त्यांचे आक्षेप टीसीएस कंपनीकडे नोंदवता येणार आहे, उमेदवारांनी केलेले आक्षेप टीसीएस कंपनीकडे जातील व त्यानंतर त्या आक्षेपाचे निरसन करण्यात येईल.
उमेदवारांनी नोंदवलेले आक्षेप खरे असेल तर संबंधित उमेदवाराला त्यांनी भरलेले शंभर रुपये शुल्क परत करण्यात येईल, तसेच उत्तर पत्रिकेमध्ये सुद्धा बदल करण्यात येईल. व त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही.
तसेच उमेदवारांनी आक्षेप केलेले असेल अशा उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचे आक्षेप अयोग्य निघेल अशांचे शुल्क वापस केले जाणार नाही, परंतु आक्षेप खरा निघाल्यास त्या उमेदवारांना त्यांनी भरलेले शंभर रुपये शुल्क वापस करण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मुंबईतील दुकानदारांना 2 महिन्याच्या आत मराठी पाट्या लावण्याचे आदेश