राज्यामध्ये सोयाबीन लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, परंतु यावर्षी सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे त्यामुळे सोयाबीनचे पीक बिकट अवस्थेमध्ये अडकलेले आहे, शेतकऱ्यांना सोयाबीनचे पीक चांगले होणार की नाही हा प्रश्न पडलेला आहे. अनेक भागांमध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक हा रोग उद्भवलेला आहे, त्यामुळे अनेक हेक्टर सोयाबीन पिके या रोगामुळे प्रादुर्भावित झालेले आहे.
एक प्रकारचा हा व्हायरस असल्यामुळे काही तासांमध्येच झाड पिवळे पडत आहे त्यामुळे सोयाबीनच्या झाडाच्या पानांची गळ होते व शेंगा सुद्धा पकत नाही, तसेच हा रोग शेंगा भरण्याच्या आधीच आल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होतील की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे, सोयाबीनच्या शेंगा बरण्याआधीच हा रोग आलेला आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
अनेक भागांमध्ये हा येलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना करायला हव्यात, या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून सल्ला घ्यावा. तसेच रोगाचा प्रादुर्भाव जाणवल्यास शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकावर बुरशीनाशकाची फवारणी करावी, जर रोग किंचित प्रमाणात असेल व कमी झाडे रोगाने प्रादुर्भाव झालेली असेल तर प्रादुर्भावित झालेल्या झाडांची पाने काढून टाकावी.
राज्यामध्ये गेल्या एक महिनाभर पावसाची कमतरता होती पावसाने दडी मारलेली होती, अशा परिस्थितीमध्ये जमिनीचे तापमान वाढले व अशा परिस्थितीत पिकाला पाण्याची कमतरता भासू लागली व पिकांची वाढ खुंटल्याने पिकावर जास्त प्रमाणात यलो मोझॅकचा प्रभाव दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर पिकांची निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे.