Pm Kisan: पी एम किसान योजनेच्या 2000 रुपयांचा लाभ पिता व पुत्र दोघानाही मिळवता येतो का? हा आहे नियम

केंद्र शासना अंतर्गत देशांमध्ये पीएम किसान योजना राबविण्यात येत आहे, शेतकऱ्यांना अत्यंत हितकारक ठरलेली पी एम किसान योजना शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रदान करते, वार्षिक सहा हजार रुपयांच्या या रकमेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो, 2019 पासून केंद्र सरकार अंतर्गत पी एम किसान योजना संपूर्ण देशांमध्ये चालू करण्यात आलेली आहे.

पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षातून तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपयांच्या हप्त्यात एकूण सहा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली जाते. देशातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. तसेच पूर्वी मात्र काही शेतकरी अपात्र ठरलेले होते परंतु चुका दुरुस्त करून अनेक शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ चालू केलेला आहे.

 

पी एम किसान योजनेचा हप्ता वडील व मुलगा या दोघांना मिळू शकतो का?

देशातील अनेक शेतकऱ्यांकडून मुलाला व वडिलांना या दोघांनाही पीएम किसान योजने अंतर्गत लाभ घेता येतो का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे परंतु मुलगा घेऊ शकतो का हा प्रश्न होता, पी एम किसान योजनेअंतर्गत काही अटी आहे त्यामधील एक अट म्हणजेच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल.

कुटुंबामध्ये पती-पत्नी किंवा मुलगा यापैकी फक्त एकालाच पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल, तसेच पीएम किसान योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, त्यामुळे नावावर जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून विचारला गेलेला हा प्रश्न त्याचे मुख्य उत्तर म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. तसेच जर एका कुटुंबातील दोन व्यक्ती पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्यापैकी एका सदस्याचा लाभ बंद करण्यात येईल.

 

जर मुलगा हा 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल आणि त्याच्या नावावर जमीन असेल तर तो देखील पी एम किसान योजना अंतर्गत लाभ मिळवू शकतो.

Pm Kisan: पी एम किसान योजनेच्या 2000 रुपयांचा लाभ पिता व पुत्र दोघानाही मिळवता येतो का? हा आहे नियम

 चंद्रावर जमीन खरेदी करणे सुरू, फक्त येवढ्या रूपयात 1 एकर जमीन, अशी खरेदी करता येते चंद्रावर जमीन