Pik Vima 2023: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीन पिक विमा, 36 महसूल मंडळांना पिक विमा मंजूर

धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून चा पावसाचा खंड आहे, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे व त्यामुळे साधारणतः उत्पन्नाच्या 50 टक्के घट येऊ शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती.

धाराशिव जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे सर्वेक्षण करण्यात यावे,अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या, व सर्वेक्षणाच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 36 महसूल मंडळामध्ये नुकसान झालेले आहे व त्यानुसार पिक विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश विमा कंपनीला देण्यात आलेले आहे.

त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील एकूण 36 महसूल मंडळामध्ये सोयाबीनचा पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, तसेच सोयाबीन पिकाचा अग्रीम पीक विमा चे वाटप करण्यात यावे, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एकूण 36 महसूल मंडळाचा यामध्ये समावेश आहे, त्यामध्ये धाराशिव तालुक्यातील अकरा महसूल मंडळाचा समावेश आहे तर, तुळजापूर मधील सात महसूल मंडळ, उमरगा येथील सहा तर, लाहोरा येथील तीन, कळम चार, परंडा येथील चार महसूल मंडळांचा समावेश आहे, यात एकूण 36 महसूल मंडळांना सोयाबीनचा अग्रीम स्वरूपात पिक विमा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.

सोयाबीन पिक विमा एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे,तसेच अधिसूचित क्षेत्रातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना रक्कम वितरित केल्यानंतर जर शेवटी सोयाबीन कापणीच्या वेळी जास्त प्रमाणात नुकसान झाले तर हे शेतकरी पुन्हा नुकसान भरपाई साठी पात्र ठरतील. जर कमी नुकसान झाले तर ती 25% विम्याची रक्कम यामध्ये समाविष्ट करण्यात येईल.

Pik Vima 2023: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीन पिक विमा, 36 महसूल मंडळांना पिक विमा मंजूर

चंद्रावर जमीन खरेदी करणे सुरू, फक्त येवढ्या रूपयात 1 एकर जमीन, अशी खरेदी करता येते चंद्रावर जमीन