E pik pahani date extended: ई पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ, अजूनही वेळ आहे लगेच करा पिक पाहणी

ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पिक पाहणी केलेली नाही अश्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण ई पिक पाहणी नोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे, तसेच शेतकऱ्यांना आता मुदतवाढ देण्यात आलेल्या तारखेपर्यंत पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

तसेच राज्यामध्ये जवळपास एक महिन्याचा पावसाचा खंड पडलेला असल्याकारणाने, पिक विम्याचे वाटप होण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो लवकरात लवकर पिक पाहणी करावी, ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केली असता अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले जाईल.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत ही पीक पाहणी केलेली नाही त्यामुळे पिक विम्याचे वाटप करत असताना त्या शेतकऱ्यांना अडचणी यायला नको या कारणाने शासनाने ई पिक पाहणी मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोंबर पर्यंत ई पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवी.

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून स्टेप बाय स्टेप ई पिक पाहणी करू शकतात. तसेच ही पीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांकडून कोणत्या प्रकारची चूक झाली तर दुरुस्त करण्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना केलेल्या चुकीमध्ये दुरुस्ती करता येते.

तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील किती शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली आहे हे बघण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच शासना अंतर्गत शेतकऱ्यांना आवाहन देण्यात आलेले आहे की पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पिक पाहणी करून घ्यावी.

E pik pahani date extended: ई पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ, अजूनही वेळ आहे लगेच करा पिक पाहणी

 ई पिक पाहणी करण्याची संपूर्ण प्रोसेस बघण्यासाठी इथे क्लिक करा