कांदा अनुदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे व त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झालेले आहे, तसेच 30 ऑगस्ट 2023 रोजी एक नवीन महत्त्वपूर्ण जीआर काढण्यात आलेला आहे, त्यानुसार अनुदानाचे वितरण कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे.
यापूर्वी 18 ऑगस्टला कांदा अनुदान वितरणाबाबत जीआर काढण्यात आलेला होता व तो जीआर पूर्णतः रद्द करण्यात आलेला आहे, तसेच हा जीआर कशामुळे रद्द करण्यात आलेला आहे व कांदा अनुदानाची प्रक्रिया आता कशाप्रकारे राबविण्यात येईल? ही संपूर्ण माहिती बघूया तसेच, 18 ऑगस्ट 2023 रोजी निघालेल्या जीआर नुसार राज्यातील शेतकऱ्यांना, प्रति क्विंटल 350 रुपये या दराने प्रति शेतकरी जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंतचे अनुदान देण्यात येणार असल्याची बाब होती.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 456 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, तसेच हे कांदा अनुदान एकूण 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केले जाणार होते, व 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली होती तसेच उर्वरित दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 54 टक्के अनुदान पहिल्या टप्प्यात तर उर्वरित अनुदान दुसऱ्या टप्प्यांमध्ये आणून वितरित केले जाणार होते.
18 ऑगस्ट 2023 रोजी निघालेला जीआर पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे व 30 ऑगस्ट 2023 रोजी एक नवीन जीआर काढण्यात आलेला आहे व त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, एकूण वितरीत करावयाची रक्कम 857 कोटी 67 लाख 58 हजार 608 रुपये एवढी आवश्यक आहे तर यापैकी वित्त विभाग अंतर्गत 465 कोटी 99 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाचे वितरण
10 कोटी पेक्षा कमी मागणी असलेले जिल्हे त्यामध्ये नागपूर, रायगड,सातारा, सांगली, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, जालना या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाचे वितरण केले जाईल, व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 22 कोटी 69 लाख 17 हजार 781 रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात येईल.
या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अश्या प्रकारे अनुदान वितरण
10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी आहे, त्यामध्ये धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नाशिक अश्या एकूण 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण अनुदानाची रक्कम 834 कोटी 98 लाख 40 हजार 926 रुपये आवश्यक आहे परंतु एवढी रक्कम उपलब्ध नसल्याकारणाने जी रक्कम उपलब्ध आहे त्या रकमेपैकी ज्या लाभार्थ्याचीनअनुदानाची रक्कम दहा हजारापेक्षा कमी असेल ती रक्कम वितरित करण्यात येईल, परंतु जर लाभार्थ्याची रक्कम 10 हजारापेक्षा जास्त असेल तर फक्त 10 हजार रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात येईल. तसेच उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील निधी कशाप्रकारे वितरित करायचा अश्या प्रकारच्या सूचना सुद्धा पुढे देण्यात येतील.
शेतकऱ्यांनो तुम्हाला माहित आहे का? 1 एकर जमिनीवर तब्बल एवढे अर्ज मिळते! फक्त तुमच्याकडे हे कार्ड हवे