गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे, त्यामुळे राज्यात पावसाला सुरुवात कधी होणार याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी आहेत, कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला परंतु असे काही भाग आहेत की ज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे, व अशा शेतकऱ्यांसाठी पावसाबाबतची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हवामान अभ्यासाक पंजाब डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
राज्यातील तुरळ ते पाऊस मध्यम स्वरूपाचा होत आहे परंतु हा पाऊस भाग बदलत म्हणजेच कुठेतरी पडत आहे, त्यामुळे शेतीला सुद्धा पाण्याची आवश्यकता भासू लागलेली आहे, तसेच हलक्या जमिनींना, लवकरच पाण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पावसाबाबतची एक अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे.
या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये मध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे, तसेच पावसाचा जोर जोरदार स्वरूपाचा असणार आहे. तसेच राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ते 30 तारखेचा दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होईल व अशी परिस्थिती सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा असणार आहे 15 ते 30 तारखेपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात होईल. ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा 15 ते 30 तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेला आहे.