Vanya Prani Nuksan: वन्य प्राणी यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ, आता येवढे पैसे मिळणार

शासन अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, वन्य प्राण्यांचा हल्ला झाल्यास पूर्वी देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण असा निर्णय शासनांतर्गत घेण्यात आलेला आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला होतो, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे, व अशा वेळेस बाधित शेतकऱ्याला लवकरात लवकर प्रथम उपचाराकरिता मदत मिळायला हवी म्हणून नुकसान भरपाई देण्यात येते, व त्याच नुकसान भरपाई मध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना आता जास्तीची रक्कम मिळणार आहे.

वन्य प्राण्यांचा हल्ल्या झाल्यास,त्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा किरकोळ अथवा गंभीर जखमी झाल्यास वेगवेगळ्या प्रकारची रक्कम शासणाअंतर्गत ठरवण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांनी ज्या व्यक्तीवर हल्ला केला अशा व्यक्तीला जास्त प्रमाणात मदत मिळावी कशा प्रकारची बाब शासनाच्या विचाराधीन होती व या संबंधित आता मिळणाऱ्या संबंधित नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांवर वाघ,रानडुक्कर,बिबट्या, गवा, अस्वल, लांडगा, मगर, हत्ती, रोही, माकड, राणकुत्रे, कोल्हा अशा प्रकारच्या प्राण्यांपासून हल्ला झाल्यास शेतकरी जखमी होतो व त्यामुळे त्या शेतकऱ्याला मदत जास्त प्रमाणात मिळायला हवी त्याकरिता शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

आता एवढी मिळणार नुकसान भरपाई

 

  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास : 25,00,000 रुपये
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून गंभीररीत्या जखमी झाल्यास: 5,00,000 रुपये
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास : 7,50,000 रुपये
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून किरकोळ जखमी झाल्यास : 50,000 रूपये 

Vanya Prani Nuksan: वन्य प्राणी यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ, आता येवढे पैसे मिळणार

शेळी मेंढी पालन योजना,अनुदान व अर्ज प्रक्रिया