अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा चालू केलेला आहे, कारण शेतीला जोडधंदा हवाच असतो, हवे तेवढ्या प्रमाणात शेती मधून उत्पन्न मिळू शकत नाही, व त्यामुळे शेतकऱ्यांची जर प्रगती व्हायची असेल तर शेतीला जोडधंदा करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतीला जोडधंदा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतकरी करत असतात, त्यामध्ये शेळीपालन, मेंढी पालन, कुकुट पालन, तसेच विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय शेतकरी करतात. शेतीला योग्य असा जोडधंदा म्हणजे मधुमक्षिका पालन, या व्यवसायामधून शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात.
जर शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करायचे असेल अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे,मध केंद्र चालू करण्यासाठी अनुदान दिले जाते, त्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकरी मध केंद्र चालू करू शकतात लाभार्थ्यांना शासन अंतर्गत मध केंद्र चालू करण्यासाठी एकूण 50 टक्के अनुदान दिले जाते, व या 50 टक्के अनुदानामध्ये शेतकरी पन्नास टक्के रक्कम स्वतः खर्च करून मध केंद्र चालू करू शकतो.
वैयक्तिक मधपाळ योजना अंतर्गत लाभार्थी 18 वर्ष किंवा या पेक्षा जास्त वय असणारा असावा, परंतु लाभार्थ्याला संस्था ज्या ठिकाणी सांगेल त्याच ठिकाणी प्रशिक्षण घ्यावी लागेल ही एक महत्त्वपूर्ण अट वैयक्तिक मध पाळ योजनेची आहे तसेच शेती असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्था याच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर दहा वर्षासाठी घेतलेली जमीन असावी, तसेच एक सुयोग्य इमारत असायला हवी ती इमारत संस्थेच्या नावे किंवा भाडे तत्वावरील असेल तरीसुद्धा चालेल. तसेच मधुमक्षिका पालन उत्पन्ना बाबत लोकांना प्रशिक्षण देता यायला हवे. अशा प्रकारची सुविधा व क्षमता असायला हवी.
केंद्र चालक प्रगतशील मधपाळ योजना अंतर्गत लागणारा व्यक्ती हा 21 वर्षाचा किंवा यापेक्षा जास्त वय असलेला असावा, तसेच व्यक्तींनी दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच इतरही काही अटी आहे त्यामध्ये लाभार्ती पात्र असायला हवा.
नागरिकांना अधिक माहितीसाठी, अकोला येथील लाभार्थी,0724- 2414250 या दूरध्वनी क्रमांकावरून माहिती मिळू शकतात, महाबळेश्वर सातारा या ठिकाणी,412806 क्रमांकावरून साधू शकता. हिंगोली ठिकाणी येथील नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी 9860537538 हा क्रमांक आहे.