विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, अंतर्गत 9 वी 11 वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते, तसेच स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थी 9 व्या वर्गामध्ये किंवा अकराव्या वर्गामध्ये असायला हवा, त्यासाठी विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ची संपूर्ण प्रोसेस पार पाडावी लागते, ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर, विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते व त्यामधून योग्य विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करण्यात येते. अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे तसेच अर्ज कशा पद्धतीने करायचा यासंबंधी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण बघणार आहोत.
9 व्या वर्गामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 75 हजार रुपये प्रमाणे दरवर्षी देण्यात येते, तसेच 11 व्या वर्गासाठी विद्यार्थ्याला 1 लाख 25 हजार दरवर्षी देण्यात येते पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी काही पात्रता असणे गरजेचे आहे त्यामध्ये विद्यार्थी इतर मागासवर्ग, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग, अर्ध भटक्या जमाती, विभक्त भटक्या जमाती यातील असावा तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त असू नये. सर्वात महत्वपूर्ण पात्रता म्हणजेच विद्यार्थी नववी व अकरावी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेमध्ये असायला हवा.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, देशातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, या कारणाने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी यशस्वी शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे गरीब मुलं आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागेल तसेच परीक्षा मराठी व हिंदी भाषेमध्ये होते, एकूण अडीच तासांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी http://www.nta.ac.in वेबसाईटला भेट द्या
पीएम यशस्वी कॉलरशिप योजना अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2023
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी
अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाईट ओपन करा https://yet.nta.ac.in/c/register/
त्यानंतर New candidate register here, यावर क्लिक केल्यानंतर दिलेल्या संपूर्ण सूचना वाचून , क्लिक हर टू प्रोसिड या ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर संपूर्ण विचारले गेलेली माहिती योग्यरीत्या तुम्हाला भरावी लागेल, तुमचा मुलगा मुलगी कोणत्या वर्गामध्ये आहे तिथे ऑप्शन सिलेक्ट करा.
विद्यार्थ्यांचे नाव टाकून ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाका. जन्मतारीख निवडा. पासवर्ड तयार करून विद्यार्थ्यांचा जन्म कोणत्या शहरामध्ये झालेला आहे ते टाका.
अशाप्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, त्यानंतर ओके बटन वर क्लिक करा. तुम्ही टाकलेल्या ईमेल आयडी वर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी बॉक्स मध्ये टाका. व्हेरिफिकेशन बटन वर क्लिक करा.
त्यानंतर पासवर्ड ईमेल आयडी व तुमच्या मोबाईलवर आलेला तो नंबर बॉक्स मध्ये टाकून लॉगिन करा. कम्प्लीट एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक करा.
त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा. माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करा.
कोणत्या शहरातील आहात तसेच तुमचा पत्ता मोबाईल क्रमांक अशाप्रकारे विविध प्रकारची माहिती विचारली जाईल संपूर्ण माहिती भरून, सेव्ह अँड सबमिट बटणवर क्लिक करा.
त्यानंतर परीक्षेत संबंधित संपूर्ण डिटेल्स भरून त्यामध्ये तुम्ही कोणत्या भाषेमधून परीक्षा देणार आहात ती भाषा निवडा, राज्य निवडून तुम्हाला ज्या ठिकाणी परीक्षा सेंटर हवे ते निवडा.
त्यानंतर तुमची एज्युकेशन डिटेल्स भरा, सेव अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याआधी तुम्ही कोणत्या योजनेचा भाग घेतलेला आहे का? तुम्हाला भाऊ व बहीण किती?वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का? हे संपूर्ण माहिती भरा.
त्यानंतर वरील दिलेली संपूर्ण कागदपत्रे योग्य साईजनुसार अपलोड करा. सेव्ह अँड नेक्स्ट या बटन वर क्लिक करा, व ओक बटन वर क्लिक करा.
तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ते पुन्हा एकदा चेक करून टिक मार्क करा. त्यानंतर फायनल सबमिट यावर क्लिक करा, अशाप्रकारे फॉर्म भरून रेडी असेल.
त्यानंतर डाउनलोड एप्लीकेशन फॉर्म या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन फॉर डाउनलोड करून ठेवा.
वन्य प्राणी यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईत मोठी वाढ, आता येवढे पैसे मिळणार