Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही? 15 ऑगस्ट पर्यंत हे काम करा

शासन अंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, परंतु त्यामध्ये राज्यातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरलेले असताना सुद्धा काही कारणास्तव, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही, व याच कारणाने शेतकरी पात्र असून सुद्धा कागदपत्रांची पूर्तता नसल्याने शेतकरी 14 व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहे.अशा शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कागदपत्रांची निश्चितता करण्यासाठी विशेष मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करण्यात आलेली आहे.

केंद्र शासना अंतर्गत पी एम किसान योजना राबवण्यात येते, राज्यशासना अंतर्गत नमो शेतकरी योजना राबविण्यात येणार आहे.पी एम किसान योजना च्या 14 व्या हप्त्यामध्ये अनेक शेतकरी अपात्र ठरलेले आहेत.नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे व त्या, पहिल्या हप्त्यामध्ये शेतकरी अपात्र ठरू नये त्यांचा खात्यावर हप्त्याचे वितरण केले जावे या कारणाने, शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मोहीम अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. या मोहिमे अंतर्गत, तालुकास्तरावर नियंत्रण समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्यामध्ये, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी,तालुका भूमि अभिलेख अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

संबंधित लाभार्थ्यांनी वरील अधिकाऱ्यांना भेटून पी एम किसान संदर्भात काही अडचणी असेल तर त्या दूर करायच्या आहेत.

पीएम किसान योजना अंतर्गत अनेक कारणाने चौदाव्या हफ्त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहे, त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही तर काही शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही,तसेच काही शेतकऱ्यांनी अद्यापही भूमी अभिलेख अद्ययावत नसल्या कारणाने शेतकऱ्यांच्या खात्यावर हत्याचे वितरण केले गेले नाही.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 12 लाख शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून वगळण्यात आलेले आहे परंतु, जर ही मोहीम यशस्वी ठरल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते व नमो शेतकरी योजनेचे हप्ते या दोन्ही हत्यांचा लाभ घेता येणार आहे.

राज्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 97 लाख शेतकरी पात्र आहे परंतु, यापैकी 85 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे, त्यापैकी एकूण बारा लाख शेतकरी पात्र असून सुद्धा कागदपत्राच्या कारणाने, त्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही. याच कारणाने 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने, विशेष प्रकारची मोहीम राबविण्यात येत आहे.

Pm Kisan Yojana: पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही? 15 ऑगस्ट पर्यंत हे काम करा

पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना, सेल्फ सर्वे मेसेज सुरू, या ॲपवरून ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा