LPG cylinder : सर्व सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घसरण

एलपीजी सिलेंडरचा किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे, यापूर्वी मात्र सिलेंडरच्या किमतीने मोठी पातळी गाठलेली होती मात्र आता घसरण झालेली दिसत आहे, तसेच घसरण झाल्यानंतर आता सध्या स्थितीचे भाव काय राहणार हा प्रश्न अर्थातच पडलेला असेल, ऑगस्ट महिना सुरू होतात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घसरण झालेली दिसत आहे, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडर साठी ची किंमत 1680 रुपये मोजावी लागणार आहे तसेच यामध्ये पूर्वी मात्र यात 19 किलोच्या व्यवसाय करिता जास्त प्रमाणात किंमत मोजावी लागत होती, व ती किंमत म्हणजे 1780 रुपये एवढी होती.

तसेच मार्च,एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किमतीमध्ये घसरन बघायला मिळत होती, मात्र जुलै महिन्यामध्ये याच किमती वाढलेल्या दिसल्या, त्यामध्ये एकूण सात रुपयांनी व्यवसायिक एलपीजी सिलेंडर मध्ये वाढ झालेली होती, तसेच त्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये, 2119.50 रुपये एवढी किंमत होती तर एप्रिल महिन्यामध्ये किमत 2028 रुपये एवढी बघायला मिळाली, अशाप्रकारे या किमती होत्या तर जुलै महिन्यामध्ये वाढ झाली होती आणि दिल्लीमध्ये याच सिलेंडरचा भाव 1780 रुपये बघायला मिळाला.

परंतु या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती आहे, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही त्या किमती पूर्वी होत्या त्याचं असणार आहे, तसेच व्यवसाय सिलेंडर करिता दिल्ली या ठिकाणी 1680 रुपये मोजावे लागेल, तसेच मुंबई या ठिकाणी 1640.50 रुपये एवढा भाव असेल, तसेच चेन्नई येथे 1852.50 एवढ्या भावात सिलेंडर उपलब्ध होईल. व कोलकत्ता या ठिकाणी 1802.50 एवढ्या भाव असेल. अशाप्रकारे व्यवसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे परंतु घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत.

LPG cylinder : सर्व सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी घसरण

राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी खुशखबर, मिळणार दुपटीने मदत, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय