राज्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात,अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, व त्यामुळे अनेक भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, शेती सुद्धा अनेक भागांमध्ये पाण्याखाली गेलेली आहे, तसेच दुकानदार वर्गाचे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दुकानदारांवर झालेल्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात असल्याने दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले होते. अनेक दुकानदारांच्या वस्तूंचे सुद्धा नुकसान झाले.
नैसर्गिक आपत्ती राज्यावर ओढवलेली असताना शासन अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात बचाव कार्य चालू होते, अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी अतिवृष्टीतून हलवण्यात आले, तसेच नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची सुविधा सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिली. व त्यामुळे अनेक नागरिक या नैसर्गिक आपत्ती मधून वाचू शकले.
राज्य सरकारचा मोठा निर्णय
नैसर्गिक आपत्तीमध्ये दुकानदार वर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व याच कारणाने त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तसेच ज्या नागरिकाचे दुकान पाण्याखाली शीरलेले आहे तसेच काहींचे दुकान पूर्णतः वाहून गेलेले आहे तर काहींच्या दुकानाचे संपूर्णतः नुकसान झालेले आहे अशा दुकानदारांना शासनांतर्गत मदत देण्यात येणार आहे.
दुकानदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत व्हावी या उद्देशाने, जे पंचनामे करण्यात आलेले आहे किंवा चालू आहे त्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम देण्यात येईल तसेच रक्कम जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत असेल. तसेच यामध्ये रेशन धारक दुकानारांपैकी अधिकृत दुकानदारांना मदत मिळणार आहे. व याच कारणाने शासनाचा हा एक महत्त्वपूर्ण व मोठा निर्णय आहे.
सतत चा पाऊस नुकसान भरपाई संदर्भात या जिल्ह्याचे महत्वाचे अपडेट, शेतकऱ्यांची यादी