केंद्र शासना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेली अत्यंत महत्त्वाची योजना, म्हणजेच पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यात येते, व आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे, परंतु अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यावर चौदावा हप्ता आलेला नाही, कारण ज्या शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही असे शेतकरी वंचित राहिलेले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आला नाही असे शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांना अर्थातच पडलेला असेल. त्यामुळे शेतकरी चिंतेत झालेले असेल की त्यांच्या खात्यावर हप्ता न येण्याचे नेमके कारण काय? ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण झाले नाही अश्या शेतकऱ्यांनी पुढील दिलेली प्रोसेस करावी.
शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 वा हप्ता न आल्यास, हे काम करा
शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदावा हफ्ता वितरित न झाल्यास शेतकऱ्यांनी 14 व्या हप्ता बाबतची अधिकृत pmkisan-ict@gov.in ई-मेल आयडी दिलेली आहे त्यावर संपर्क साधायचा आहे. तसेच 155261 या हेल्पलाइन नंबर वर सुद्धा शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, तसेच 0120-6025109 ,011-23381092 हे सुद्धा हेल्पलाइन नंबर आहे त्यावर शेतकरी संपर्क साधून माहिती मिळू शकतात, व लँडलाईन 23382401 नंबर क्रमांक वर संपर्क साधून सुद्धा 14 हप्ता न येण्याचे निराकरण शेतकरी करू शकतात. व त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 वा हप्ता आलेला नाही अश्या शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.