दहावी पास उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, भारतीय टपाल विभागाअंतर्गत सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर, डाक सेवक या पदाची 30,041 जागांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक पात्र असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.तसेच उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी लागेल. तसेच भरतीसाठी काही वयोमर्यादा सुद्धा देण्यात आलेली आहे तसेच शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा उमेदवारांनी पात्र असायला हवे. त्यामुळे इच्छुक पात्र असणारे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकणार आहे.
भारतीय टपाल विभाग |Tapal Vibhag|
पदसंख्या – 30041
पदाचे नाव – शाखा पोस्ट मास्टर,सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करू नये.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावरून उमेदवार अर्ज करू शकतात.
- शैक्षणिक पद्धतीमध्ये तसेच वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवार पात्र असायला हवा.
- केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये उमेदवार दहावी पास असायला हवा.
- शेवटच्या दिनांक पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु त्यानंतर अर्ज करता येणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 23 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
भरले जाणारे पद व वेतन
क्र | पद | वेतन |
1 | शाखा पोस्ट मास्तर | 12,000 ते 29,380रू |
2 | डाक सेवक/सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर | 10,000 ते 24,470रू |
अटी व शर्ती
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरती संबंधी जाहिरात वाचून घ्यावी, त्यामध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्ती यामध्ये उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अन्यथा स्वीकारण्यात येणार नाही तसेच शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज उमेदवार करू शकतात
- अर्ज करताना संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज करताना कोणत्याही प्रकारची खोडताना किंवा अयोग्य माहिती टाकू नये. संबंधित जास्त चुका आढळल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही