कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा नावावर अतिशय कमी खर्चामध्ये फेरफार करण्याची महत्त्वाचे दस्त म्हणजे हक्क सोड पत्र होय. कुटुंबातील कोणताही सदस्य स्वस्तामध्ये कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे हक्क सोड पत्र करू शकतो. म्हणजेच अतिशय दोनशे रुपयांच्या बॉण्डवर वारसा हक्काने मिळालेली जमीन कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे स्वइच्छेने मोबदला न घेता किंवा मोबदला घेऊन हक्क सोड पत्र करता येते.
हक्कसोड पत्र म्हणजे नेमके काय?
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असलेला स्वतःचा हिस्सा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे स्व इच्छेने व कायमस्वरूपी सोडून दिल्याबद्दल नोंदणी कृत करणे म्हणजेच हक्क सोड पत्र होय. त्यामुळे हक्क सोड पत्र हा खूप महत्त्वाचा असतो कारण याच्याद्वारे पुढील जमिनीचे फेरफार केल्या जाते. तसेच अतिशय कमी खर्चामध्ये हक्क सोड पत्र करता येते.
हक्क सोड पत्र हे वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळत असलेल्या जमिनी चे, कुटुंबातील इतर सदस्याचे नावे हक्कसोड पत्र करता येते. उदाहरण सांगायचे झाल्यास आई वडील आपल्या मुलाच्या नावे, भाऊ आपल्या बहिणीच्या नावे, बहिण बहिणीच्या नावावर, किंवा मुले आपल्या वडिलांचे नावावर,वडील आपल्या मुलांच्या नावावर, बहिण भावाच्या नावावरती अशाप्रकारे हक्क पत्र केले जाऊ शकतात.
हक्कसोड पत्र करताना मोबदला दिला जातो का?
अनेकांना प्रश्न पडतो की हक्क सोड पत्र करताना मोबदला दिला जातो का, हक्क सोड पत्र करत असताना विना मोबदला केले जाते, परंतु जर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे हक्क सोड पत्र करायचे झाल्यास कोण कोणत्या कुटुंबांमध्ये काही अटी व शर्ती घालण्यात येतात व त्यामुळे हक्क सोड पत्र करताना त्या बदल्यात मोबदला सुद्धा दिल्या जातो.
हक्क सोड पत्र हे लेखी व नोंदणीकृत असणे अत्यंत आवश्यक आहे कारण हे असल्याशिवाय पुढे याची कोणत्याही प्रकारची नोंद केली जात नाही, तसेच नोंदणी द्वारा फेरफार सुद्धा करण्यात येते. हक्क सोडपत्र हे दोनशे रुपयांच्या बॉण्डच्या माध्यमातून केले जाते.
हक्कसोड पत्र कसे करावे?
हक्क सोड पत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होत असते व त्यामुळे हक्क सोड पत्र नोंदणी कृत असणे अत्यंत आवश्यक आहे,हक्कसोडपत्र जिल्ह्यातील दुय्यम सहाय्यक निबंधकाचे कार्यालय कडे,त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो. जो व्यक्ती हक्क सोडपत्र इतर व्यक्तीच्या नावावर करत आहे त्या दोघांचेही फोटो, अंगठ्याचे ठसे, मिळकतीचे कागदपत्र, सह्या अशाप्रकारे कागदपत्रे लागतात, त्यानंतर दुय्यम निबंधकाच्या अंतर्गत हक्क सोड पत्राचा दस्तऐवज देण्यात येतो व तो दस्तऐवज पुढे तलाठ्याकडे जमा करावा लागतो. तलाठी हक्क सोड पत्र नोंदणीकृत आहे की नाही हे तपासतात व त्यानंतरच पुढील व्यक्तीच्या नावावर केले जाते.
कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवाना कसा काढायचा? कृषी सेवा केंद्र लायसन्स प्रक्रिया