राज्यामध्ये कापसाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, तसेच गेल्यावर्षी कापसाला खूप चांगला भाव मिळाला व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केलेली होती, परंतु यावर्षी कापसाला भाव मिळणार का? हा शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न पडलेला आहे? सर्व पिकांपैकी कापसावर येणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण कापूस पिकाला मजुरांची आवश्यकता भासते परंतु मजुराच्या टंचाईमुळे कापूस पिक घेणे शेतकऱ्यांना अवघड चाललेले आहे.
राज्यांमध्ये यावर्षी उशिरा पाऊस दाखल झाल्याने कापसाच्या लागवडी सुद्धा लांबणीवर पोहोचलेल्या होत्या, त्यामुळे कापूस पिकाची स्थिती ही संपूर्णतः पावसावर अवलंबून असल्यामुळे कापूस उत्पादन यावर्षी घटते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यावर्षी कापूस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व त्यामुळे यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल व शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरेल.
जागतिक पातळीवर कापसाला मागणी
एकूण कापूस उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादन चीन,भारत,ब्राझील व अमेरिका या चार देशांमध्ये घेतले जाते व यावर्षी कापूस पिकाला अनुकूल स्थिती नसल्याने कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ञांच्या मते वर्तवण्यात येत आहे. कारण जागतिक कापूस उत्पादन सहा टक्क्यांनी घडणार असा अंदाज व्यक्त केलेला आहे. जरी यावर्षी पाऊस उशिरा दाखल झालेला असला तरी सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कापसाचे भाव दिलासादायक असणार आहे.
कापसाला चीनमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे तसेच भारतामध्ये सुद्धा कापसाची मागणी वाढेल असे सांगण्यात येत आहे, व साधारणता 12 टक्क्यांनी चीनमधील कापूस उत्पादन कमी होण्याचे संकेत तसेच भारतामध्ये सुद्धा दोन टक्क्यांनी कापूस उत्पादन कमी होण्याचा इशारा तज्ञ देत आहे. अशा परिस्थितीमध्ये कापसाला मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती जागतिक पातळीवर निर्माण होईल व यामुळे कापसाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र यामध्ये कापसाच्या दरात दिलासा मिळणार आहे.
सोयाबीन पिकावरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, या कीटकनाशकाची फवारणी करा, मिळतील उत्तम रिझल्ट