दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस जवळपास एक महिना लेट दाखल झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या राखडलेल्या होत्या तसेच पावसाने जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दडी मारलेली होती व या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण झालेला आहे, जवळपास 20 ते 21 दिवसांचा पावसाचा खंड शेतातील पिकांना धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अशा पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे अशा प्रकारचे आदेश कृषी आयुक्तांनी दिलेले आहे.
पावसाच्या खंडामुळे राज्यात 91 टक्के पेरण्या पूर्ण झालेले आहे परंतु पेरल्यानंतर पडलेला पावसाचा खंड यामुळे शेती पिकाला नुकसान पोहोचण्याची भीती निर्माण झालेली आहे, तसेच राज्यांमध्ये एक रुपयात पिक विमा चालू करण्यात आलेला असल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा मध्ये सहभाग नोंदवलेला आहे, त्यामुळे राज्यातील 13 तालुक्यातील 53 मंडळाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
खरीप पिक विमा योजनेमध्ये जर 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असेल तर नुकसान भरपाईच्या 25% विमा रक्कम अधिक दिली जाते, हे लक्षात घेऊन राज्यातील 13 तालुक्यातील 53 मंडळाचे सर्वेक्षण लवकरात लवकर करण्यात यावे, अशा प्रकारचे आदेश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिलेले आहे. कारण या 13 तालुक्यातमध्ये 53 मंडळामध्ये पावसाचा खंड हा 22 ते 25 दिवसाचा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला यामुळे मोठा फटका बसलेला असून उत्पन्नावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे.
कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात यावे, असे सांगण्यात आलेले आहे व यामुळे नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे.
या 53 मंडळातील सर्वेक्षण करण्याचे आदेश
जिल्ह्यानुसार मंडळे
1) अकोला – अकोला 1, अकोट 1, बाळापुर 1, बार्शीटाकळी 1, मुर्तीजापुर 2
2) नगर – कोपरगाव 3
3) अमरावती – दर्यापूर 1
4) औरंगाबाद – औरंगाबाद 4, गंगापूर 5, वैजापूर 3
5) बुलढाणा – जळगाव जामोद1 ,शेगाव 2
6) जळगाव – अमळनेर 1, चाळीसगाव 3, मुक्ताईनगर 1, रावेर 3,यावल 1
7) जालना – बदनापूर 3, घनसावंगी 1, जालना 3
8) नाशिक – देवळाली 1, सिन्नर 1
9) परभणी – सेलू 1
10) पुणे – बारामती 1
11) सांगली – आटपाडी 1, जत 1, खानापूर विटा 1
12) सातारा – मान दहिवडी 3, फलटण 1
13) सोलापूर – माळशीरसी 1