राज्यातील अभय योजना काय आहे व या योजनेचा थकबाकी दारासाठी काय फायदा होऊ शकतो? अभय योजना कशाप्रकारे राबविण्यात येते त्यासाठी अर्ज कसा करावा कशाप्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी ही संपूर्ण माहिती थकबाकीदारांना माहीत असायला हवी. कारण अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांसाठी थकबाकी मधून मुक्त होण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे.
महाराष्ट्रामध्ये अभय योजना चालू करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे थकबाकी मुक्ती कडे जाणे होय, तसेच यामध्ये वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत अभय योजना जाहीर करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत 30 जून 2017 पर्यंत च्या कालावधीतील थकबाकीकरिता अभय योजना लागू होणार आहे. तसेच 31 ऑक्टोंबर 2023 या मुदतीच्या आत मध्ये अर्ज करावा लागणार आहे.
थकबाकीदारांसाठी व्हॅट, बीएसटी, सीएसटी कायद्या अंतर्गत असलेल्या थकबाकी मधून मुक्त होण्याची एक महत्त्वाची संधी असणार आहे व याकरिता, साधारणतः दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेली थकबाकी निलंबित करण्यात येईल.जर थकबाकी दोन लाखापेक्षा जास्त असेल तर थकबाकी करिता विवादित करामध्ये 50 ते 70 टक्के व व्याजामध्ये 85 ते 90% तसेच जास्तीत जास्त 95% पर्यंतची सवलत दिली जाणार आहे,
थकबाकी 50 लाखापर्यंत असेल तर त्या व्यापाऱ्यांना 20 टक्के एवढी रक्कम एकत्रितपणे भरून थकबाकी पासून मुक्त करण्यात येईल, 50 लाखापर्यंत जास्त थकबाकी असेल तर त्याकरिता हप्ते समितीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशाप्रकारे जर थकबाकीदाराला थकबाकी पासून मुक्त व्हायचे असेल तर,त्याकरिता अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
सर्वप्रथम अर्ज करण्याकरिता MAHAGST पोर्टलवर जावे त्यानंतर,फॉर्म-I आणि फॉर्म-IA सेंटरमेंट साठी अर्ज डाऊनलोड करावा त्यानंतर, अर्जाच्या प्रकारानुसार साच्या भरावा लागेल. पूर्वतयारी केलेली फाईल अपलोड करा व संबंधित कागदपत्रे योग्य साईज नुसार अपलोड करावे तसेच सर्व झाल्यानंतर अर्जाची पोचपावती घेणे आवश्यक आहे, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सादर करा. पेमेंट करण्यासाठी सुद्धा MAHAGST website वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर त्यामध्ये पेमेंटचे पर्याय देण्यात येईल त्यावर क्लिक करून पिन व कॅपच्या टाकून पुढे जा या बटणावर क्लिक करून. विचारले गेलेले संपूर्ण माहिती भरून प्रोसिड बटनावर क्लिक करा, त्यानंतर पेमेंट गेटवे पेज स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून, नेट बँकिंगची लॉगिन क्रेडेन्शियल्स इंटर करून पेमेंट करावे, त्यानंतर ट्रांजेक्शन पावती तयार केली जाईल, पावती डाऊनलोड करून ठेवावी. अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया व पेमेंट पद्धत वरील प्रमाणे करावी.