देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा चांगलाच लाभ होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका आलेल्या आहे व त्यामुळे निवडणुकीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.देशामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकरी पात्र आहे,व शेतकऱ्यांच्या खात्यावर 27 जुलैला डीबीटी च्या माध्यमातून 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे रंगलेली होती, तसेच अर्थसंकल्पामध्ये सुद्धा या संबंधित मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या परंतु जवळ येणाऱ्या निवडणुकांमुळे पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हप्त्यांमध्ये वाढ होणार का? हा मोठा प्रश्न पडलेला आहे.
हप्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या संबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालया समोर ठेवण्यात आलेला आहे, व त्यावर सर्व हप्त्याची स्थिती असणार आहे, त्यामुळे जर प्रस्तावाला पुढे मंजुरी मिळाली तर मात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा मोठा लाभ होणार आहे.
पी एम किसान योजनेच्या रकमेत 50 टक्के वाढीची शक्यता आहे, जर रकमेमध्ये वाढ करण्यात आली तर शेतकऱ्यांना येणारा दोन हजार रुपयांचा हप्ता हा 3000 रुपयांचा होऊ शकतो व, शेतकऱ्यांना येणारी एकूण सहा हजार रुपयांची रक्कम यामध्ये वाढ होऊन, सहा हजाराऐवजी 9 हजार रुपये वार्षिक दिले जाईल. अशा प्रकारे हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली तर शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये वार्षिक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.