शेत जमिनी संबंधित अनेक प्रकारच्या वादाची प्रकरणी पुढे येत होती, यात अनेक कारणाने शेतकरी आपली जमीन कसायचा नाही, इतर नागरिकांना शेती देऊन दुसऱ्या नागरिकांकडून जमीन कसून घ्यायचा. परंतु जमिनीत कसणाऱ्या नागरिकाचे नाव सातबारावर नोंदवले जात होते व याबाबतच अनेक वाद विवादास्पद प्रकरने पुढे आलेली असताना मात्र 2002 मध्ये जमीन कसणाऱ्या चे नाव सातबाऱ्यावर लावने बंद केलेले होते. कारण यामध्ये जमीन कसणारा इतर नागरिक सातबारा उताऱ्यावरून मूळ मालकाचे नाव काढून स्वतःला मालक करून घेत होतो, या कारणाने ज्या शेतकऱ्यांची मूळ जमिनी असायची त्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जायची.
शेती मालकाची यामध्ये फसवणूक होत असल्या कारणाने 2002 मध्ये सातबारा वर ,शेती कसणाऱ्या नागरिकाचे नाव नोंदवणे रद्द करण्यात आलेले होते, कारण यामध्ये मूळ शेती मालकाची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत होती. मुळ शेती मालकाचे नाव सातबारावरून काढून, जमीन कसणारा नागरी स्वतःला मालक म्हणत होता व यामुळे शेती मालकाची फसवणूक होत होती. परंतु 2002 मध्ये सातबारावर नाव नोंदणी बंद झालेली होती.
परंतु आता एक नवीन सॉफ्टवेअर येणार आहे, त्यामध्ये सात ब करिता स्वतंत्र प्रणाली विकसित केली जात असून त्यामध्ये नागरिकांना मूळ मालकासहित कब्जे धारकाचे नाव सुद्धा नोंदवता येणे शक्य होणार आहे, याकरिता पीक पेरा आपल्या नावाने नोंदवावा अशी माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात येत आहे.
मूळ मालकासह कब्जा धारकाचे नाव नोंदविता येणार आहे तसेच की संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. शेती करणाऱ्या कब्जे धारकाला नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तसेच त्यांनी केलेला क्बजा हा कायदेशीर आहे असे पुरावे त्याला सादर करावे लागेल, व त्यानंतर तहसीलदारांतर्गत सात ब उताऱ्यावर मूळ शेती मालक तसेच कब्जेधारकाला नोटीस पाठवण्यात येईल. व खात्री करून सात ब उताऱ्यावर नाव नोंदवण्यात येईल.