Tur Market Rate: तुरीच्या भावात मोठी वाढ, तुरीचे दर 11000 पार, आणखीन किती वाढणार तूर

शेतकरी बांधवांना तुरीच्या दरात विक्रमी पातळीने वाढ होत आहे. तुरीचे दर आता अकरा हजारांवर पोहोचले असून सध्या बाजारामध्ये तुरीची आवक कमी झालेली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी दबावत असलेली तूर आता अकरा हजार वर पोहोचलेली आहे. ज्याप्रमाणे सध्या बाजारामध्ये तुरीला मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे तुरीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकंदरी तुरीच्या या भावा संदर्भातील विश्लेषण आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे का? या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या लेखात Tur Market Rate संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा तुरीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी होत असून ते आता विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहे. यंदा भारतात Toor Market Price उत्पादन हे 32 लाख 50 हजार टणांवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सध्या जागतिक लेव्हल वर मागणीप्रमाणे toor उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वत्र तुरीच्या भावात मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण होत आहे.

 

तूर पोचली 11 हजारांवर:

शेतकरी मित्रांनो विदर्भाच्या काही बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक अकरा हजार रुपये इतका दर मिळालेला असून ज्या शेतकऱ्यांनी तूर साठवून ठेवलेली होती अशा शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा यामुळे मिळालेला आहे. परंतु असे क्वचितच शेतकरी असतील ज्यांच्याकडे तूर शिल्लक असेल. Toor Market Rate हे आता मोठ्या प्रमाणात वाढलेले असले तरीसुद्धा शेतकऱ्यांना मात्र याचा फायदा घेता आला नाही कारण की अनेक शेतकऱ्यांनी सहा ते सात हजार रुपये इतक्या दरावर तुरीची विक्री केलेली आहे.

 

परंतु आता भाव वाढून काय करायचं अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहे. तुरीच्या ऐवजी जर कापसाचे भाव वाढले असते तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस साठवून आहे. त्यामुळे ते शेतकरी भाव वाढीची प्रतीक्षा करत आहे.

 

यावर्षी तुरीची उत्पादन घटले होते:

दरवर्षी भारतात जवळपास 45 लाख टन तुरीची गरज असते परंतु यंदा तुरीच्या उत्पादनात घट झालेली असून देशात केवळ तीस लाख टन इतकीच तूर पिकलेली आहे त्यामुळे पुरवठा कमी होत असल्यामुळे आता तुरीला मोठ्या प्रमाणात toor rates मिळत आहे.

 

यावर जागतिक तुरीचे उत्पादन 42 लाख टनांवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, त्यामध्ये प्रामुख्याने म्यानमार मध्ये दोन लाख 75 हजार टन इतके उत्पादन तर आफ्रिकेमध्ये सात लाख टन इतके उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यावर्षी भारताने तुरीची आयात देखील झिरो पॉईंट 50 लाख टनाने वाढवलेली आहे. अनेक देशांमध्ये आता निर्यातीसाठी तूर शिल्लक राहिलेली नसून अनेक देशांनी तुरीची निर्यात सध्या कमी केलेली आहे

सध्या भारतात तुरीचा तुटवडा निर्माण असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून देशांमध्ये तूर आयात केल्या जाऊ शकते.

 

शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये व 1 रुपयात पिक विमा, मंत्रिमंडळ निर्णय झाला | Schemes For Farmer Of Maharashtra

तुरीला पुढे कसा भाव राहील?

अनेक देशांनी तुरीची आयात कमी केलेली असल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी तुटवडा असल्यामुळे नवीन हंगामातील तूर येईपर्यंत भाव असेच तेजीत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु चालू हंगामातील पाऊस मान तसेच लागवड यावर सुद्धा Toor Market Price निर्भर असणार आहे.

Kusum Solar Nondani: अरे बापरे, कुसुम योजना अंतर्गत आतापर्यंत एवढे मोठे अर्ज प्राप्त, जाणून घ्या जिल्हा निहाय अर्जाची यादी