मित्रांनो गटई कामगार बंधूंसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी अनेक प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असतात. गटई कामगारांसाठी लोखंडी पत्राचे स्टॉल पुरवणारी गटई कामगार लोखंडी पत्रा स्टॉल योजना ही राबविण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांसाठी ही Gatai Stall Yojana Maharashtra राबविण्यात येत असते. रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या गट ही कामगारांना स्वतःचा हक्काचा स्टॉल हा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतो. जेणेकरून गटई कामगारांना स्वतःचे हक्काचे स्टॉल मिळल्यामुळे त्यांचे वारा पाऊस होऊन यांच्यापासून संरक्षण होईल. मित्रांनो अशाच प्रकारची योजना राज्यातील एका जिल्ह्याकरिता सुरू आहे त्याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.
गटई स्टॉल योजना काय आहे? What is Gatai Stall Yojana
मित्रांनो राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील गटई कामगारांना त्यांचा स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय योग्य रीतीने करता यावा याकरिता स्वतःचे हक्काचे लोखंडी पत्र्याचे स्टॉल या गटई स्टॉल योजना अंतर्गत वितरित करण्यात येत असते. या स्टॉलमुळे राज्यातील या गटई कामगारांना त्यांचा व्यवसाय कोणतेही हवामान परिस्थितीमध्ये करता येईल.
या Gatai Stall Yojana महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना लोखंडी पत्राची स्टॉल बांधण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगार असाल तर या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतात.
गटई स्टॉल योजना महाराष्ट्र अटी व शर्ती Gatai Stall Yojana Maharashtra Terms and Conditions
मित्रांनो गटही कामगारांकरिता राबविण्यात येणाऱ्या या गटई लोखंडी स्टॉल योजना अंतर्गत खालील अटी व शर्ती ठरवून देण्यात आलेले आहे.
1. या योजनेअंतर्गत अर्ज केवळ अनुसूचित जाती या प्रवर्गातील चर्मकार बांधवच करू शकतात.
2. या योजनेअंतर्गत वयोमर्यादा ही 18 ते 50 ठरवून देण्यात आलेली आहे.
3. अर्ज करणारा अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.
4. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराची एकूण सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी असावे.
5. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या चर्मकार बांधवाकडे या व्यवसायाचा अनुभव तसेच व्यवसायाबद्दल ज्ञान असावे.
6. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवलेला नसावा.
महत्वाचं अपडेट: कर्जमाफी योजना तिसरी यादी जाहीर; आत्ताच डाउनलोड करा
गटई स्टॉल योजना अर्ज कसा आणि कुठे करायचा? How and where to apply for Gatai Stall Scheme?
मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात गटई कामगारांना लोखंडी पत्राचे स्टॉल पुरविणारी योजना सुरू आहे. त्यामुळे सध्या या Gatai Stall Scheme Maharashtra अंतर्गत केवळ बुलढाणा जिल्ह्यातील अर्जदारांना अर्ज करता येत आहे. इतर जिल्ह्यांकरिता अर्ज सुरू झाल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल.
बुलढाणा जिल्ह्यातील गटई काम करणाऱ्या कामगारांकडून सन 2022 23 करिता या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत अर्जदारांना अर्ज हे समाज कल्याण विभाग बुलढाणा येथे करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
मित्रांनो या Gatai Stall Yojana अंतर्गत अर्जदारांना अर्ज करण्याची आव्हान करण्यात आलेली असून सध्या अर्ज सुरू आहेत. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे.
गटई स्टॉल योजना लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे Required Documents For Gatai Stall Yojna :-
या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. स्वतःचे आधार कार्ड
2. विहित नमुन्यातील अर्ज
3. जातीचा दाखला
4. रहिवासी दाखला
5. पासपोर्ट फोटो
6. उत्पन्नाचा दाखला
7. जागेबाबत कागदपत्र
वरील कागदपत्रे या Gatai Stall Scheme Maharashtra योजने अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक असून अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी अंतिम तारखेच्या आत विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रे जोडून सादर करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज अचूकपणे सादर करायचा आहे कारण की चुकलेले अर्ज रद्द करण्यात येणार असून चुकलेले अर्ज दुरुस्त करता येणार नाही.
अशाप्रकारे राज्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी गटई कामगारांकरिता योजना सुरू असून या योजने संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट करून प्रश्न विचारा. ही माहिती जिल्ह्यातील सर्व मित्रांना नक्की शेअर करा.