मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना मेंढी पालन करण्याकरिता 20 मेंढ्या व एक 1 मेंढा गट वाटप करणारी महत्त्वपूर्ण अशी योजना महाराष्ट्र शासनाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी यांना मेंढ्याचा गट वाटप (mendhi palan gat vatap yojana) करण्यात येणार असून अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली असून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊया महामेष मेंढी पालन योजना बद्दल माहिती.
महामेष मेंढी पालन योजना; 20 मेंढ्या व 1 मेंढा वाटप योजना | Mahamesh Mendhi Palan Vatap Yojana 2022 Maharashtra |
महामेष मेंढी पालन योजना 2022 महाराष्ट्र Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana Maharashtra
आपल्या महाराष्ट्र राज्यात मेंढीपालनाला चालना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Mahamesh Yojana) अंतर्गत 75 टक्के अनुदानावर आपल्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती म्हणजेच भज-क या प्रवर्गातील व्यक्तींना मेंढ्याचे गट वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना 20 मेंढ्या व 1 नर मेंढा यांचा गट वाटप करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यांना 75 टक्के अनुदानावर मेंढ्यांचा गट वाटप करण्यात येईल. mendhi palan gat vatap yojana
महामेष मेंढी पालन योजना(Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana) महाराष्ट्र अंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असली पाहिजे. या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती महामेष च्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्यामुळे या योजनेस संदर्भात अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
महामेष मेंढी पालन योजना अर्ज करण्याची तारीख
मित्रांनो या महामेष मेंढी पालन योजना (Mahamesh mendhi palan gat vatap yojana) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील अर्जदारांकडून अर्ज मागवणे सुरू झालेले असून 15/11/2022 ते 30/11/1022 या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे.
महामेष मेंढी पालन योजना अंतर्गत अर्ज कोण करू शकतो?
मित्रांनो या महामेष मेंढी पालन योजना महाराष्ट्र(Mahamesh Mendhi Palan Yojana Maharashtra) अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती म्हणजेच भज-क या प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यातील व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.
महामेष योजनेची वैशिष्ट्ये
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या महामेष मेंढी पालन योजना अंतर्गत खालील वैशिष्ट्ये आहेत.
1. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वीस मेंढ्या एक नर मेंढा यांचा गट वाटप करण्यात येणार आहे.
2. मेंढी पालन करिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
3. त्याचप्रमाणे पशुखाद्य कारखाने उभारण्याकरिता सुद्धा 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
4. मेंढी पालन करण्याकरिता संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याकरिता सुद्धा 75 टक्के अनुदान आहे.
महामेष मेंढी पालन योजना अंतर्गत पात्रता Mendhi Palan Yojana Maharashtra
महामेज मेंढी पालन योजना अंतर्गत खालील पात्रता ठरविण्यात आलेल्या असून त्यानुसार लाभ प्रक्रिया असणार आहे.
1. या योजनेअंतर्गत अर्ज करणारा तसेच लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्याचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असावी लागते.
2. या योजनेअंतर्गत महिलांकरिता 30 टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले असून अपंगांना तीन टक्के आरक्षण राखीव आहे.
3. या योजनेअंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गट व पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
4. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला अर्ज करता येणारा असून तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेला असल्यास अर्ज करता येणार नाही.
5. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकर नसावा.
महामेष योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज कसा करायचा?How to apply under Mahamesh Yojana Maharashtra?
मित्रांनो महामेष मेंढी पालन योजना महाराष्ट्र 2022 23 करिता अर्ज सुरू झालेल्या असून खालील पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. Mendhi Palan Yojana Maharashtra
अर्ज हा ऑनलाइन महामेष च्या वेबसाईटवरून तसेच महामेष च्या एप्लीकेशन वरून करता येणार आहे. खालील प्रमाणे वेबसाईटवरून अर्ज करावा.
1. सर्वप्रथम महामेष ची वेबसाईट ओपन करावी.
3. आता या वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदाराला स्वतःचा आधार क्रमांक प्रविष्ट करून लॉगिन करायचे आहे.
4. आता तुम्हाला महामेष च्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती त्याचप्रमाणे जमिनीचा तपशील व इतर प्रकारची सर्व विचारलेली माहिती प्रविष्ट करायची आहे.
5. ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणत्या घटकांमध्ये लाभ मिळवायचा ते निवडून घ्यायचे आहे.
6. आता तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थितपणे चेक करा आणि शेवटी सबमिट करा.
7. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याचा एक पॉप-अप मेसेज दिसेल.
8. आता तुमच्यासमोर अर्जाची पावती आलेली आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा भविष्यामध्ये ते तुम्हाला कामी पडणार आहे.
हे नक्की वाचा:- नुकसान भरपाई नवीन याद्या आज प्रकाशित झाल्या. आत्ताच डाऊनलोड करा
महामेष मेंढी पालन योजना कागदपत्रे
महामेष मेंढी पालन योजना (Mahamesh Mendhi Palan Yojana) अंतर्गत सध्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची नसून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुमची या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या लॉटरीमध्ये निवड झाली तर तुम्हाला कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील. त्यावेळेस कागदपत्रे अपलोड करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे.
मेंढी पालन योजना संदर्भातील ही माहिती इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.