अटल बांबू समृद्धी योजना महाराष्ट्र | Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra

 

मित्रांनो शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये बांबूच्या झाडांची लागवड करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत अनुदान वितरित करण्यात येत आहे. बांबू या झाडाला गरिबांचे लाकूड असे म्हटले जाते. सहज उपलब्ध असणारे व गरिबांना परवडणारे वनोपज म्हणून बांबू या झाडाची ओळख आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अटल बांबू समृद्धी योजना महाराष्ट्र(Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra ) संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

अटल बांबू समृद्धी योजना महाराष्ट्र | Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra
अटल बांबू समृद्धी योजना महाराष्ट्र | Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra

 

लाकडा संबंधित गरजा पूर्ण करण्याकरिता बांबू या झाडांचा उपयोग करण्यात येतो. बांबूचे झाड हे एक बहुउपयोगी असे झाड आहे, ज्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे बांबूचे झाड हे इतर झाडांच्या तुलनेत जास्त काळ टिकते. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण असलेल्या बांबूंच्या झाडांच्या लागवडीकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अनुदान योजनेमुळे जास्तीत जास्त बांबूच्या झाडांची लागवड व्हावी असे उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र राज्यात Atal Bamboo Samruddhi Yojana राबविण्यात येत आहे.

अटल बांबू समृद्धी योजना

आपल्या भारत देशात बांबू ची बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 26 हजार कोटींची बाजारपेठ बांबूंची आहे. बांबूच्या बाजारपेठेमध्ये आपल्या भारत देशात बोर्ड कार्टेज, इंडस्ट्रीज प्लाय बोर्ड, बांबू फर्निचर, बांबू पल्प व बांबू मॅट इत्यादी बाबींचा समावेश आहे. बांबू ही एक महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे या वनस्पतीमुळे शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य लाभते. त्याचप्रमाणे बांबूचे झाड हे जास्तीत जास्त वेळ टिकते तसेच बांबूच्या झाडांची वाढ सुद्धा इतर झाडांच्या तुलनेत लवकर होते तसेच हे झाड सदाहरित आहे. बांबूच्या झाडामुळे ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

बांबूच्या झाडांचा पर्यावरणाला तसेच मानवाला व शेतकऱ्याला होणारा फायदा लक्षात घेता केंद्र शासनाच्या वतीने बांबू मिशनची स्थापना केलेली आहे. केंद्र शासनाच्या या मिशन अंतर्गत शेतकरी बांधवांना बांबूच्या झाडांची लागवड करण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बांबूच्या रोपांचा पुरवठा करणे तसेच लागवडीवर अनुदान देणे यासारख्या बाबीवर केंद्र शासन भर देत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र (Atal Bamboo Samruddhi Yojana Maharashtra) शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याकरिता शासन मान्यता दिलेली आहे.

अटल बांबू समृद्धी योजनेची उद्दिष्टे Objectives of Atal Bambu Samriddhi Yojana

atal bamboo samruddhi yojana ची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

1. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना टिशू कल्चर बांबूच्या रोपांचा पुरवठा करणे.
2. बांबूच्या लागवडीसाठी शेतकरी बांधवांना अनुदान वितरण करणे.
3. महाराष्ट्र राज्यातील बांबूच्या लागवडीचे क्षेत्र वाढविणे.
4. बांबूच्या लागवडीमुळे शेतकरी बांधवांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणे.
5. बांबू पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.

बांबू लागवड करण्याचे फायदे Benefits of planting bamboo

शेतकऱ्यांच्या दृष्टीने बांबूचे पिके खूप फायदेशीर पीक आहे. बांबू लागवड करण्याचे खालील फायदे होतात.

1. इतर झाडांच्या तुलनेत बांबूचे झाड जास्त काळ टिकते त्यामुळे दरवर्षी बांबूच्या झाडांची लागवड करण्याची आवश्यकता भासत नाही.
2. बांबूला जास्त किंवा कमी पावसाचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे अतिवृष्टी असो किंवा कोरडा दुष्काळ यामुळे बांबूवर कोणताही परिणाम होत नाही.
3. बांबूच्या झाडांच्या असलेल्या देठांमध्ये प्रत्येक वर्षी सात ते आठ नवीन बांबू तयार होत असतात. त्यामुळे बांबूच्या झाडांची संख्या वाढत जाते.
4. कोणत्याही जमिनीवर बांबूच्या झाडांची लागवड करण्यात येऊ शकते.
5. आपण आपल्या शेतामध्ये बांबूच्या झाडांची लागवड केल्यास आपण इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या झाडाच्या लागवडीमुळे शेतीवर होणारा 40 टक्के पर्यंत खर्च वाचवू शकतो.
6. बांबूच्या लागवडीमुळे शेत जमिनीची धूप थांबते.
7. बांबूच्या झाडांपासून 26 प्रकारचे मूल्यवर्धक उत्पादने तयार करता येतात. जसे की लोणचे ,भाजी, लाकूड, पडदे, फर्निचर , अगरबत्ती, कापड या प्रकारचे

महत्वाचं अपडेट:- पीक विमा यादी 2022-23 महाराष्ट्र जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा.

अशा प्रकारचे विविध फायदे आपल्याला बांबू लागवडीपासून मिळू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ शेतकरी बांधवांना बांबूच्या झाडांची विक्री म्हणजेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार आहे.

बांबू लागवडीकरिता अनुदान Bamboo Lagwad Anudan Yojana

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांबू पिकांच्या लागवडीकरिता अनुदान देण्यात येत आहे. खालील प्रमाणे अनुदान वितरण प्रक्रिया आहे.

सर्वप्रथम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये बांबूच्या पिकांची लागवड करायची आहे त्यानंतर त्या पिकांची तपासणी करण्यात येईल. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन आहे अशा जमीन धारकांना 50 टक्के पर्यंत सबसिडी म्हणजेच अनुदान देण्यात येते. तसेच चार हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या जमीन धारकांना 80 टक्के पर्यंत सबसिडी देण्यात येते.

या योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारी सबसिडी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

 

अटल बांबू समृद्धी योजना लाभार्थी निवड प्रक्रिया

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे व अर्ज सादर करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यानंतर महामंडळ आधारित प्राप्त अर्जावर छाननी करून पात्र लाभार्थ्यांना त्यांची निवड करून अनुदान वितरित करण्यात येईल. या योजनेअंतर्गत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

महत्वाचं अपडेट:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी आज प्रकाशित झाली. आत्ताच डाऊनलोड करा 

अटल बांबू समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे Required Documents For Atal Bamboo Yojana

Atal Bamboo Samruddhi Yojana अंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदान मिळवण्याकरिता अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा व आठ अ
2. जमिनीचा नकाशा ची प्रत
3. रहिवासी दाखला
4. ठिबक सिंचनाची सोय तसेच बांबूच्या झाडांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणाची सोय असल्याबाबतची हमीपत्र
5. बँक पासबुक
6. आधार कार्ड
7. शेतामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र

अटल बांबू समृद्धी योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा? How to apply online for Atal Bambu Samriddhi Yojana?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे अर्ज सादर करायचा आहे.

1. सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईटवर जा.
अर्ज करण्याची वेबसाईट 
2. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून अर्ज सादर करा.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

बांबू लागवड योजना संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी अटल बांबू समृद्धी योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो. ही माहिती आवडली असेल तर यांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.