उद्यम नोंदणी काय आहे, कशी करायची | What is Udyam, Udyam Registration in Marathi

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण उद्यम नोंदणी काय आहे? उद्यम नोंदणी कशी करायची? What is Udyam, Udyam Registration in Marathi उद्यम नोंदणी कोणी करायची? उद्यम नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, उद्यम नोंदणी करण्याचे फायदे? उद्यम नोंदणीसाठी लागणारे शुल्क आणि उद्यम नोंदणी करण्याची ऑनलाईन प्रक्रिया  या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. उद्यम रजिस्ट्रेशन माहिती मराठी

उद्यम नोंदणी काय आहे, कशी करायची | What is Udyam, Udyam Registration in Marathi

 

उद्यम नोंदणी म्हणजे काय? | What is Udyam Registration Information Marathi :-

उद्यम नोंदणी( Udyam Nondani Mahiti Marathi) करण्याची प्रक्रिया ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली आहे. ही उद्यम नोंदणी करण्याची प्रक्रिया 1 जुलै 2020 पासून सुरू करण्यात आलेली आहे. ही MSME/UDYOG AADHAAR नोंदणीची नवीन प्रक्रिया आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग धारकांनी हे उद्योग नोंदणी करायची आहे. उद्यम नोंदणी (Udyam Registration in Marathi) प्रक्रियेस आपण msme रजिस्ट्रेशन असे म्हणू शकतो. हे नोंदणी msme अंतर्गत होते, भारत सरकारकडे आपल्या व्यवसायाची नोंदणी होत असते.

उद्यम नोंदणी  ( MSME) कोणी करावी? Who are eligible for Registration as Udyam (MSME)

1. एक व्यक्ती कंपनी( एकल व्यापार)
2. भागीदारी व्यवसाय( Partnership Business) संस्था
3. सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योग स्थापन करण्याचा विचार असणारी कोणतीही व्यक्ती MSME अंतर्गत Udyam Registration करू शकते.
4. अविभक्त हिंदू कुटुंब
5. मर्यादित दायित्व भागीदारी
6. प्रायव्हेट कंपनी लिमिटेड
7. सहकारी संस्था
8. लघु तसेच मध्यम उद्योग

 जर तुमचा व्यवसाय हा वरील प्रकारात असेल तर तुम्ही udhyam उद्यम नोंदणी(Udyam Registration in Marathi) करू शकतात.उद्यम रजिस्ट्रेशन माहिती मराठी

उद्यम नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Documents For Udyam Registration

उद्यम रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

1. पॅन कार्ड
2. बँक डिटेल
3. आधार कार्ड
4. पत्त्याचा पुरावा( विजेचे बिल किंवा भाड्याचा  करार)
5. Income Tax Return (भरत असल्यास)
6. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
7. कंपनी टर्न ओव्हर सर्टिफिकेट
8. प्लांट पत्ता आणि कार्यालयाचा पत्ता

उद्यम नोंदणीसाठी किती शुल्क आहे? Fees for Online Udyam Registration

सध्या उद्यम( Udyam Registration in Marathi)नोंदणी ही फ्री मध्ये होत आहे.

उद्यम प्रमाणपत्राची वैधता किती? What is the validity of Udyam Certificate

उद्यम(Udyam Registration Information Marathi) प्रमाणपत्राची कोणत्याही प्रकारची वैधता नाही, उद्यम नोंदणी प्रमाणपत्र हे व्यवसाय असे पर्यंत वैद्य राहणार आहे.  उद्यम नोंदणी प्रमाणपत्र(Udyam Certificate) नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.

हे नक्की वाचा:- पोलीस भरती महाराष्ट्र करिता आवश्यक कागदपत्रे 

उद्यम नोंदणी केल्याने काय फायदे मिळू शकतात? Udyam Registration Benefits

1. कर्ज मिळणे सुलभ
2. टेंडर मध्ये सहभाग मिळण्याची संधी
3. पेटंट मिळण्यास सुलभ
4. अनेक योजनांमध्ये सबसिडी
5. Electricity bill मध्ये सवलत मिळू शकते
6. स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत मिळू शकते
7. डायरेक्ट टॅक्स मध्ये फायदे मिळू शकतात

एका व्यवसायाकरिता किती उद्यम नोंदणी करू शकतो

कोणत्याही उद्यम व्यवसायाला एकच उद्योग नोंदणी क्रमांक असणार आहे. एकापेक्षा जास्त उद्यम नोंदणी क्रमांक आपल्याला मिळवता येत नाही. जर एखादा उद्योग हा उत्पादन आणि सेवेमध्ये गुंतलेला असेल तर दोन्ही उपक्रम हे एकाच उद्यम नोंदणी मध्ये जोडण्यात यावे.

उद्यम नोंदणी करिता अर्ज कसा करायचा? How to apply for Udyam registration

 

उद्यम नोंदणी करण्याकरिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.

उद्यम नोंदणी(Udyam Registration Form) करण्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा.

वेबसाईट लिंक

आता उद्यम ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी  वरील वेबसाईट ओपन केल्या नंतर  “For new Entrepreneurs who are not registered yet as MSME” या पर्यायावर क्लिक करा.

आता खालील माहिती ही प्रविष्ट करायची आहे.
तुमचे आधार कार्ड वर जे नाव असेल त्या प्रमाणे तुमचे नाव प्रविष्ट करावे. त्याच प्रमाणे आता तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. आता otp हा येणार आहे, त्याकरिता “Validate & Generate OTP” या पर्यायवर क्लिक करा. आता तुम्हाला आलेला otp हा प्रविष्ट करा. आणि Validate करून घ्या. त्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेला otp हा successfully validated होणार आहे.

आता तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा, संस्थेचा प्रकार निवडायचा आहे. आता तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका. आणि त्याला validate करून घ्या. ‘सेल्फ डिक्लरेशन आधार’ वर फॉर्ममधील सर्व माहिती भरा.

आता खालील माहिती ही प्रविष्ट करा.

1.  मोबाईल नंबर
2. तुमच्या इंटरप्राईजेस चे नाव
3. सामाजिक श्रेणी व लिंग
4. ई-मेल आयडी
5. तुमच्या कार्यालयाचा पत्ता
6. तुमचा व्यवसाय सुरू झाल्याची तारीख
7. तुमच्या व्यवसायात उत्पादन सुरू झाले आहे की नाही ते निवडा
8. तुम्ही तुमच्या व्यवसायात गुंतवणूक कधी केली ती तारीख
9. ग्रॅम घटकाचे बँक तपशील
10. एनआयसी कोड
11. व्यवसाय युनिटची मुख्य क्रिया
12. आता जर तुम्हाला शासनाच्या ई मार्केट वर नोंदणी करण्यास आवड असेल तर ते निवडा.
13. जर तुम्हाला TREDS पोर्टल वर नोंदणी करण्याची इच्छा असल्यास त्या ठिकाणी हो किंवा नाही हे निवडा
14. तुमच्या व्यवसाय नोकरी करत असलेल्या व्यक्तींची संख्या
15. आता खाली दिलेल्या ड्रॉप डाऊन मधून तुमचा जिल्हा उद्योग केंद्र निवडा.

हे नक्की वाचा:- घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र जाहीर

वरील सर्व माहिती ही प्रविष्ट केल्या नंतर अटी व शर्तीशी सहमत असेल तर चेक बॉक्स वर क्लिक करा. आणि सबमिट या पर्याय वर क्लिक करा. आता तुम्हाला शेवटचा ओटीपी येणार आहे त्याकरिता अंतिम ओटीपी मिळवा या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी हा प्रविष्ट करून “Final submit” हा पर्याय दिसेल त्या पर्याय वर क्लिक करा.

आता तुम्ही उद्यम नोंदणी करता यशस्वीरित्या अर्ज केलेला आहे. तुम्हाला आता एक नोंदणी क्रमांक मिळालेला असेल. त्यानंतर तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट(Udyam Registration Certificate) प्राप्त होणार आहे. उद्यम सर्टिफिकेट(Udyam Certificate) हे लगेच प्राप्त होते.त्या उद्यम प्रमाणपत्रावर एक क्यूआर कोड असेल त्याच्या द्वारे उद्योगाच्या तपशिलाची माहिती मिळवता येईल.

Udyam Certificate विषयी ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. या पोस्ट विषयी काही शंका असल्यास कमेंट करा. आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करण्याचा प्रयत्न करू. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.