आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू, कागदपत्रे अर्ज प्रक्रिया | Aaple Sarkar Seva Kendra Application Process

 

मित्रांनो जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र(Aaple Sarkar Seva Kendra Nondani) म्हणजेच सेतू केंद्र ओपन करून ग्राहकांना सुविधा पुरवून चांगले उत्पन्न कमवायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत आपण आपले सरकार सुविधा केंद्र मिळवून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवून ऑनलाईन ची त्याचप्रमाणे तहसीलची विविध कामे करून देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतो. जर तुम्ही रायगड जिल्ह्यातील असाल तर तुमच्याकरिता अर्ज हे सुरू झालेले आहेत. या पोस्टमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. Apale Sarkar Seva Kendra New Application

आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू; कागदपत्रे अर्ज प्रक्रिया | Aaple Sarkar Seva Kendra Application Process
आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू; कागदपत्रे अर्ज प्रक्रिया | Aaple Sarkar Seva Kendra Application Process

 

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत रायगड जिल्हा करिता अर्ज करणे सुरू झालेले आहे. त्यामुळे जर तुम्ही रायगड जिल्ह्यातील रहिवासी असाल तर आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज करू शकतात. Aaple Sarkar Seva Kendra Application Form

आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज कुठे करायचा? Apale Sarkar Seva Kendra

मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज(Aaple Sarkar Seva Kendra Nondani) हा आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन करावयाचा असतो. रायगड जिल्ह्यातील रहिवाशांनी आपले सरकार सेवा केंद्र चा अर्ज हा रायगड जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करावयाचा आहे.

हे नक्की वाचा:- आधार कार्ड केंद्र असे मिळवा; आणि चांगले उत्पन्न मिळवा!

आपले सरकार सेवा केंद्र आवश्यक कागदपत्रे Documents For Apale Sarkar Seva Kendra

मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र(apale sarkar seva Kendra) अंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराची पॅन कार्ड आणि आधार कार्ड
2. सीएससी प्रमाणपत्र
3. संगणकीय पात्रता प्रमाणपत्र
4. शैक्षणिक प्रमाणपत्र
5. कॅरेक्टर सर्टिफिकेट
6. तुम्ही ज्या जागेवर आपले सरकार सेवा केंद्र टाकू इच्छित असाल त्या जागेची कागदपत्रे
7. अपंग प्रमाणपत्र (असल्यास) – प्राधान्य मिळते

वरील कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावयाची आहेत.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? Apale Sarkar Seva Kendra Application Process

मित्रांनो जर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र(apale sarkar seva kendra) म्हणजे सेतू केंद्र हवे असेल तर, आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या आपले सरकार सेवा केंद्र करिता जाहिराती निघत असतात त्यावेळेस अर्ज करावयाचा असतो. आपले सरकार सेवा केंद्र करिता जाहिराती ह्या जिल्हाधिकारी कार्यालया मधून काढण्यात येत असतात. सर्वप्रथम आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहिरात दिसल्यानंतर तिथूनच ऑफलाइन अर्ज डाऊनलोड करून घ्यावयाचा असतो. अर्ज ऑनलाईन असल्यास त्याची लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर दिलेली असते. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर प्रेम करून तो अर्ज अचूकपणे भरावयाचा असतो. त्या राजाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करावयाचा असतो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत(जिल्हा सेतू समिती मार्फत) अर्जाची छाननी होते पात्र उमेदवारांची लिस्ट लागते. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांना आपले सरकार सेवा केंद्र आयडी पासवर्ड देण्यात येत असतो. अशा प्रकारची प्रक्रिया ही आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी पूर्ण करावी लागत असते. परंतु वरील प्रक्रियेमध्ये जिल्ह्यानुसार थोडेफार बदल होऊ शकतात.Aaple Sarkar Seva Kendra Application Form

हे नक्की वाचा:- ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे? 

आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत?

1. अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे लागते.
2. अर्ज मंजूर करण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार हा जिल्हा सेतू समिती कडे असतो.
3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
4. आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
5. Csc सेंटर असणे आवश्यक आहे. केंद्र नसल्यास आधी csc सेंटर करिता अर्ज करावा. Csc करीता अर्ज केल्याची ऑनलाईन पावती जोडून आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज करावा.
6. आपले सरकार सेवा केंद्र मिळाल्यास नमूद जागेवरच केंद्र सुरु करावे.

 

हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र अंतिम पात्र यादी जाहीर 

आपले सरकार सेवा केंद्र रायगड अर्ज करण्याची अंतिम तारीख Apale Sarkar Seva Kendra

आपले सरकार सेवा केंद्र रायगड करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12/10/2022 आहे. 12/10/2022 संध्याकाळी 06.15 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे.