मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana Information Marathi) ही मुलींसाठी राबवण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत आपण सुकन्या समृद्धी खाते ओपन करून त्यामध्ये मुलींचा विवाह, मुलींचे शिक्षण अशा कार्यकरिता मोठी रक्कम ही मिळवू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत ज्या मुलींचे खाते ओपन करण्यात येते त्या खात्यामध्ये जर आपण दर महिन्याला रक्कम जमा करत गेलो तर आपण खूप मोठा पैसा जमा करू शकतो. कारण की सुकन्या समृद्धी योजनेवर(Sukanya Sanruddhi Yojana Mahiti Marathi) भारत सरकार खूप मोठ्या प्रमाणावर व्याज देत आहे. ही योजना बचत खाते तसेच एफ डी यांच्या पेक्षा जास्त व्याज देते. त्यामुळे जर आपण आपल्या मुलींच्या उज्वल भविष्य करिता पैसे गुंतवणूक सुरू केली तर भविष्यकाळामध्ये आपल्याला खूप मोठा पैसा मिळू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना मध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी (Sukanya Samriddhi Yojana 2022 Information Marathi)
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana Maharashtra)या योजनेचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. कारण की ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना स्पेशली मुलींकरिता राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंतर्गत आपण मुलींचा विवाह मुलींचे शिक्षण याकरिता मोठी रक्कम उभी करू शकतो. सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Scheme 2022) ही केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येणारी स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. केंद्र सरकारच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपण मुलगी लहान असताना गुंतवणूक सुरू केली तर आपण पंधरा वर्षापर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर एक मोठी रक्कम मिळवू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केव्हा झाली?When was Sukanya Samriddhi Yojana started?
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात ही वर्ष 2015 मध्ये आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सुकन्या समृद्धी योजना सध्याचा व्याजदर किती? What is the current interest rate of Sukanya Samriddhi Yojana?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत सध्या 7.6 टक्के दराने व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये दरवर्षी बदल होऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे केंद्र सरकार चक्रवाढ पद्धतीने देत असते. ज्यावेळेस ही सुकन्या समृद्धी योजना सुरू झाली त्यावेळेसचा व्याजदर हा 9% होता.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?Who can benefit under Sukanya Samriddhi Yojana?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत आपल्या भारत देशातील मुली ज्यांचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी आहेत अशा मुली या सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत लाभ घेऊ शकतात.
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश?Purpose of Sukanya Samriddhi Yojana?
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश असा आहे की सुकन्या समृद्धी(SSY SCHEME) योजनेच्या अंतर्गत मुलींचे खाते तयार करून त्यामध्ये गुंतवणूक करून मुलींच्या भविष्यासाठी म्हणजेच मुलींचे शिक्षण मुलींचा विवाह यांच्याकरिता एक मोठी रक्कम प्राप्त करणे.
सुकन्या समृद्धी योजना पात्रता (Sukanya Samriddhi Yojana Eligibility):-
सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana in Marathi) अंतर्गत लाभ घेण्याकरिता खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
1. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येणार आहे.
2. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते सुरू करताना किमान 250 रुपये भरून हे खाते तुम्हाला उघडता येणार आहे.
3. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता सुकन्या समृद्धी खाते तयार करताना मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा जास्त चालणार नाही.
4. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे कायदेशीर पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. कायदेशीर पालक मध्ये आई वडील यांचा समावेश आहे.
सुकन्या समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे (Sukanya Samriddhi Yojana Required Documents):-
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे खाते तयार करताना खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. मुलीचे आधार कार्ड ( असल्यास)
2. नवीन खाते उघडण्याकरिता सुकन्या समृद्धी अर्ज
3. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो ( मुलींचे तसेच तिच्या कायदेशीर पालकाचे)
4. मुलींच्या कायदेशीर पालकाचे आधार कार्ड
5. मुलीचा जन्माचा दाखला
6. पॅन कार्ड ( असल्यास )
हे नक्की वाचा:- पोस्ट ऑफिस 299 आणि 399 रुपयांचा अपघात विमा योजना
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मिळणारे इतर लाभ:-
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana Maharashtra) अंतर्गत यापूर्वी दोन मुलींकरिता जर आपण वर्षाला दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली तर आपल्याला 80 सी अंतर्गत कर सवलत मिळत होती. परंतु आता या सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत नवीन बदल करून तिसऱ्या मुली करिता सुद्धा ही कर सवलत लागू करण्यात आलेली आहे.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत गुंतवणूक कशी करायची( How to invest under Sukanya Samriddhi Yojana )?
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana Mahiti Marathi)अंतर्गत आपण एका वर्षात कमीत कमी 250 रुपये आणि एका वर्षात जास्तीत 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतो.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत सध्याचा व्याजाचा दर हा 7.6% आहे. जर आपण या दराने गुंतवणूक केल्यास आपल्याला किती लाभ मिळू शकतो हे आता आपण पाहणार आहोत.
जर आपण दर महिन्याला सुकन्या समृद्धी योजनेच्या(Sukanya Samriddhi Yojana Information Marathi) खात्यामध्ये 500 रुपये गुंतवणूक केली तर आपली गुंतवणूक ही त्यावेळेस 14 वर्षापर्यंत 84 हजार रुपये होणार आहे. या गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने एकूण व्याज हे 1 लाख 61 हजार 490 रुपये होणार आहे. आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारे एकूण मॅच्युरिटी रक्कम म्हणजेच परिपक्वता रक्कम म्हणजेच 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ची रक्कम ही 2 लाख 45 हजार 490 रुपये असणार आहे.
अशा पद्धतीने आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अतिशय कमी गुंतवणुकीमध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज मिळत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत 61 लाख रुपये असे मिळणार:-
जर आपण सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samriddhi Scheme 2022)अंतर्गत मुलगी एका वर्षाची असताना बचत खाते उघडले आणि वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत म्हणजेच 15 वर्ष गुंतवणूक केली तर खालील प्रमाणे परतावा मिळेल.
जर आपण सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत सुकन्या समृद्धी बचत खात्यामध्ये दर महिन्याला 12 हजार 500 रुपये किंवा प्रत्येक वर्षी 1.50 लाख रुपये गुंतवणूक केली तर आपली एकूण गुंतवणूक ही 21 लाख रुपये असणार आहे. त्यावर आपल्याला मिळणारे एकूण 7.6 टक्के दराने व्याज हे 40 लाख 37 हजार 260 रुपये असणार आहे. त्यानंतर आपल्याला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या हातामध्ये एकूण 61 लाख 37 हजार 260 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खातं कुठे उघडायचे:-
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत आपण सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Yojana Saving Bank Account) हे भारतीय डाक विभागात किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडू शकतो.
सुकन्या समृद्धी योजना 2022 नियमात बदल:-
सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana 2022) मध्ये काही बदल करण्यात आलेले आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Scheme Maharashtra 2022-SSY) अंतर्गत आतापर्यंत यापूर्वी आपल्याला जर मुलीचा मृत्यू झाला किंवा तिचे लग्न करायचे असेल तरच आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद करता येत होती. परंतु आता या नियमा मध्ये बदल करण्यात आलेला असून आता सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकास जर प्राण घातक आजार असेल तर किंवा तिच्या पालकाचा मृत्यू झाल्यास अशा वेळेस आपण मुदतीपूर्वी सुकन्या समृद्धी बचत खाते बंद करू शकतो.
अशाप्रकारे सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samriddhi Yojana) ही राबविण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा काही शंका असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. सुकन्या समृद्धी योजना विषयीची ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.