पोलीस पाटील विषयी संपूर्ण माहिती मराठी | Police Patil Information Marathi

 

मित्रांनो पोलीस पाटील(Police Patil Mahiti Marathi) ही एक गावातील व्यक्तीला मिळालेली महत्त्वपूर्ण पोस्ट असते. प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील होय. प्रत्येक खेडेगावामध्ये पोलीस पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस पाटलाच्या मदतीने गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करण्यात येत असते. त्याचप्रमाणे पोलीस पाटील हे गावातील तंटामुक्तीचे कार्य करत असतात. कारण की ते गावातील तंटामुक्ती समितीचे प्रसिद्ध सचिव म्हणून काम पाहत असतात. त्यामुळे गावामध्ये पोलीस पाटील(Police Patil) हे एक महत्त्वपूर्ण असणारे पद आहे.पोलीस पाटील विषयी संपूर्ण माहिती मराठी Police Patil Information Marathi आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलीस पाटील काय आहे? पोलीस पाटील(Police Patil) बनण्याकरिता पात्रता काय असते? पोलीस पाटलाची निवड कशी केली जाते? पोलीस पाटलाची निवड कोण करते? आणि पोलीस पाटलाचे कर्तव्य काय आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटलाचे अधिकार काय आहेत? याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

 

पोलीस पाटील विषयी संपूर्ण माहिती मराठी | Police Patil Information Marathi police patil mahiti marathi
पोलीस पाटील विषयी संपूर्ण माहिती मराठी | Police Patil Information Marathi

 

 

 

पोलीस पाटील काय आहे?What is Police Patil?

 

पोलीस पाटील(Police Patil) हा गावातील पोलीस विभागाचा महत्त्वपूर्ण घटक असतो. जर एखाद्या वेळेस गावामध्ये खून, दरोडा आकस्मिक मृत्यू, किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न? किंवा इतर बाबी घडल्यास पोलीस पाटील हा याची प्राथमिक माहिती घेऊन ही माहिती पोलीस स्टेशनला कळविण्याचे काम हे पोलीस पाटील करीत असतो. पोलीस पाटील हे महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांना संपर्क करून गावातील विविध समस्या तसेच अनिश्चित घडणाऱ्या घटना सोडवित असतात. त्याच प्रमाणे गावात अनोळखी संशयास्पद व्यक्ती आल्यास त्याची माहिती पोलीस पाटील हा पोलीस विभागाला देत असतो. एकंदरीतच पोलीस पाटील (Police Patil Information Marathi) हा पोलीस विभाग व प्रशासकीय विभाग यांच्या मधील दुवा असतो.  आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 ला झाली, त्यानंतर १९६७ ला ‘महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम’ अमलात आला, व तेव्हा पासूनच पोलीस पाटील या पदाला शासकीय दर्जा प्राप्त झाला. एका खेडे गावात एक किंवा त्यापेक्षा जास्त पोलीस पाटलांची नेमणूक केल्या जाऊ शकते. पोलीस पाटील यांच्या खाली गावातील कोतवाल असतात.information about Police Patil In Marathi पोलीस पाटील हे एक गावातील मानाचे तसेच प्रतिष्ठेचे पद आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती

 

पोलीस पाटीलांची कर्तव्ये काय आहेत? What are the duties of police Patil? :-

 

पोलीस पाटीलांची कर्तव्ये खालील प्रमाणे आहेत.Detail Information About Police Patil

 

1. पोलीस पाटलाची नेमणूक ही ज्या गावात करण्यात आलेली आहे, ते गाव ज्या क्षेत्रातील असेल अश्या क्षेत्रातील  कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे.

2. कार्यकारी अधिकारी यांनी जर एकाद्या अहवालाची मागणी केली असल्यास, त्यांना योग्य तो अहवाल सादर करणे.

3. पोलीस पाटील ज्या गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असतील, त्या गावातील विविध कामांकरिता पोलीस अधिकाऱ्यांना मदत करणे.

4. पोलीस पाटील ज्या गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असतील, त्या गावातील सार्वजनिक आरोग्य तसेच फौजदारी गुन्हे आणि गावातील समुदायांची सर्वसाधारण ही  दंडाधिकारी यांना कळविणे.

5. पोलीस अधिकाऱ्यांना सर्व कामात मदत करणे

6. पोलीस पाटलाच्या गावच्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी सोपविलेल्या कामांचे (वॉरंट बजावणे इत्यादी बाबींचा पालन करणे).

7. पोलीस पाटील ज्या गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत असतील, त्या गावातील जर सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असेल तर पोलीस अधिकारी यांना तसेच दंडाधिकारी यांना कळविणे.

8. शासनाने देण्यात येणाऱ्या विविध निर्देशांचे पालन करणे.

9. पोलीस पाटील यांनी सार्वजनिक उपद्रव प्रतिबंध, गुन्हे प्रतिबंध तसेच गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणेला मदत करणे.

10. बेवारस मृत्यू तसेच संशयास्पद मृत्यू झालेल्या प्रेतांचे अनधिकृत दफन होऊ न देणे, याची माहिती पोलीस यंत्रणा यांना देणे.

11. गावातील तंटा मुक्ती समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहणे. तसेच गावातील तंटे सोडविणे.

12. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितास सहाय्य करणे योग्य त्या उपाययोजना करणे.

13. गावात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये आपली जबाबदारी पार पाडणे.

 

वरील सर्व कर्तव्ये ही गावातील पोलीस पाटील यांना पार पाडायची असतात.

 

 

हे नक्की वाचा:- वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान योजना मिळणार प्रत्येकी 12 हजार रुपये 

 

पोलीस पाटील बनण्यासाठी पात्रता Eligibility to become Police Patil

ज्या उमेदवारांना police patil बनायचे असेल त्यांच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

 

1. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील बनायचे असेल तो उमेदवार किमान दहावी पास (10th) असावा लागतो.

2. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील बनायचे असेल तो उमेदवार हा 25 ते 45 या वयोगटातील असावा लागतो.

3. ज्या उमेदवारांना पोलीस पाटील बनायचे असेल त्या उमेदवारावर कोणताही गुन्हा नोंद नसावा लागतो. त्याच प्रमाणे चारित्र्य हे चांगले असावे लागते.

4. उमेदवार हा ज्या गावचा रहिवासी आहे, त्याच गावाकरिता तो पोलीस पाटील म्हणून नियुक्त होऊ शकतो.

5. त्यामुळे पोलीस पाटील या पदाकरिता अर्ज करताना स्वतःच्या गावाकरिता अर्ज करावा लागतो.

 

 

 

पोलीस पाटील बनण्याकरिता अभ्यास तसेच परीक्षा कोणत्या असतात? What are the studies and exams to become a Police Patil?

 

पोलीस पाटील(Police Patil Information Marathi) बनण्याकरिता लिखित परीक्षा ही घेण्यात येत असते. ही लिखित परीक्षा 80 मार्क ची असते. तसेच 20 मार्काची तोंडी परीक्षा किंवा मुलाखत सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. या परीक्षांकरिता 90 मिनिटे इतका वेळ देण्यात येत असतो. पोलीस पाटील बनण्याकरिता घेण्यात येणाऱ्या पेपर हा दहावी बेस वर असतो. म्हणजे दहावीच्या पात्रते एवढे सोपे प्रश्न यामध्ये असतात. यामध्ये सहसा स्थानिक माहिती, सामान्य ज्ञान, सामान्य गणित, इंग्रजी अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणजे या प्रश्नांची लेव्हल ही दहावी बेस असते. ही परीक्षा पास झाल्यानंतर मेरिट लिस्ट तयार करून ज्यांना जास्त मार्क आहे त्यांची तुमच्या गावांमध्ये पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात येत असते.

 

 

पोलीस पाटील यांना मानधन किती?How much is the salary of Police Patil?

पोलीस पाटील(police patil information in marathi) यांना दर महिन्याला पाच हजार रुपये इतके मानधन देण्यात येत आहे.

 

 

पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते? Who appoints the police patil?

मित्रांनो आपल्या गावातील पोलीस पाटलांची(Police Patil Mahiti Marathi) नियुक्ती ही आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असतात. किंवा जर जिल्हाधिकारी यांनी एखादा अधिकारी नेमून दिलेला असेल तर तो पोलीस पाटलाची नियुक्ती करत असतो. किंवा उपजिल्हाधिकारी सुद्धा पोलीस पाटील यांची नियुक्ती करू शकतात. पोलीस पाटील यांची नियुक्ती सुरुवातीला पाच वर्षे करिता करण्यात येत असते. त्यानंतर जर नेमलेल्या पोलीस पाटलाची कामगिरी जर चांगली असेल तर जिल्हाधिकारी त्या पोलीस पाटलास आणखीन पुढील पाच वर्षे वाढवून देतात. पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षापर्यंत असू शकते.

 

 

 

हे नक्की वाचा:-फुल शेती अनुदान योजना माहिती मराठी

 

 

पोलीस पाटील यांनी गैर वर्तणूक केल्यास तो खालील शिक्षेस पात्र असतो If a Police Patil misbehaves, he is liable to the following punishments

 

जर पोलीस पाटील(Police Patil) यांनी गैर वर्तणूक केली किंवा आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नाही तर, पोलीस पाटील यांना गैर वर्तणूक बाबत शिक्षा करण्याचे अधिकार हे  उप जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांना असतात.

 

जर पोलीस पाटील यांनी गैर वर्तणूक केली किंवा आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नाही तर, पोलीस पाटील यांना खालील प्रमाणे शिक्षा करण्यात येऊ शकते.

 

🛑जर पोलीस पाटील (police patil) यांच्या मुळे शासनास आर्थिक नुकसान झाले तर, त्या झालेल्या नुकसानीची पूर्तता ही पोलीस पाटील यांच्या मानधन मधून करण्यात येऊ शकते.

🛑पोलीस पाटील यांना एक वर्ष करिता निलंबित करणे.

🛑पोलीस पाटील यांना पूर्णतः सेवेतून काढून टाकण्यात येते.

🛑पोलीस पाटील यांच्या विरुद्ध चौकशी लावणे.

🛑पोलीस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते.

अश्याच अपडेट करिता आमच्या Teligram Channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा 

 

मित्रांनो पोलीस पाटील यांच्या विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.