आषाढी एकादशी 2022 माहिती मराठी | Ashadhi Ekadashi 2022 Mahiti Marathi

 

आषाढी एकादशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसाठी त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण असा सण आहे. Ashadhi Ekadashi 2022 आज आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र भरातून वारकरी पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. हे वारकरी पायी पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला अनन्य महत्व आहे.

 

आषाढी एकादशी 2022 माहिती मराठी | Ashadhi Ekadashi 202 Mahiti Marathi
आषाढी एकादशी 2022 माहिती मराठी | Ashadhi Ekadashi 202 Mahiti Marathi

 

 

आषाढी एकादशी ही महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्वपूर्ण असा सण आहे. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठलाची पालखी घेऊन पंढरपूरला जात असतात. दरवर्षी आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शासकीय पद्धतीने विठ्ठलाची पूजा करत असतात. मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाची पूजा करीत असतात. विठ्ठलाच्या वारीचा सोहळा हा आठशे वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. Ashadhi Ekadashi 2022

 

आषाढी एकादशी 2022 कधी आहे (Ashadhi Ekadashi 2022 Date)

 

यावर्षीची आषाढी एकादशी Ashadhi Ekadashi 2022 ही 10 जुलै 2022 रोजी रविवारी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव हा आषाढी एकादशी आहे.

 

 

 

आषाढी एकादशी महत्व(Ashadi Ekadashi Importance)

 

आपल्या महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदाय लागलेला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात, आणि तेथील चंद्रभागेच्या नदीत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. Ashadi Ekadashi Wari 2022

 

 

हे सुद्धा वाचा:- गुरू पौर्णिमा 2022 माहिती मराठी

 

 

विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला अनेक पालख्या या जात असतात. आणि त्या पालख्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून निघत असतात. Ashadi Ekadashi Wari 2022  संत ज्ञानेश्वरांची पालखी ही आळंदीहून निघत असते. तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून निघत असते. संत निवृत्तीनाथांची पालखी ही त्रंबकेश्वरवरून येथून निघत असते. संत एकनाथ महाराजांची पालखी ही पैठणहून निघत असते. ह्या सर्व पालख्या आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेत असतात.

 

 

 

आषाढी एकादशी कशी साजरी केली जाते

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक टाळ आणि मृदंगाचा गजर करत पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल नाम तुझे ओटी पाऊले चालतील वाट हरीची असा जयघोष करत हे भाविक आपला आनंद साजरा करत असतात. हे भाविक फुगड्या खेळत असतात. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि विठ्ठलाच्या भक्तीत दंग होत असतात. पालखी मधील भाविक ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता पंढरपूरच्या दिशेकडे रवाना होत असतात. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी रांगेत लागून विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. जे भाविक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकत नाहीत असे वारकरी घरूनच श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन घेत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक उपवास पकडत असतात.

सर्व महाराष्ट्रातील वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल…