मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र | CMEGP 2022 तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी

 

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र CMEGP 2022 अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी योजनाही राबविण्यात येत आहे. या विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील युवा तसेच बेरोजगार तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनता यावे याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांना व्यवसायिक बनता यावे तसेच स्वयंरोजगार प्राप्त व्हावा याकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. CMEGP 2022

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र | CMEGP 2022 तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी cmpeg image
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र  | CMEGP 2022  तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सबसिडी

 

 

या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.CMEGP scheme Maharashtra

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र उद्देश CMEGP 2022 :-

या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे होऊन आत्मनिर्भर बनता यावे याकरिता स्वयंरोजगार प्राप्त होण्यासाठी स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी सबसिडी योजना राबविण्यात येत आहे.

हे नक्की वाचा:- शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र पात्रता CMEGP 2022 eligibility:-

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र अंतर्गत CMEGP योजनेकरीता स्थानिक रहिवासी कोणत्याही प्रकारचे स्थायी उत्पन्न असलेले व्यक्ती अर्ज करू शकतात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे 18 वर्षापासून 45 वर्ष दरम्यान असावी लागते. जर अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, किंवा महिला प्रवर्गातील तसेच माजी सैनिक किंवा अपंग व्यक्ती असेल तर यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच हे लाभार्थी वय वर्षे 50 पर्यंत अर्ज करू शकतात.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासनाच्या स्वयंरोजगार आधारित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी याआधी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगारासाठी किंवा व्यवसाय उभारणी करण्याकरिता कर्ज देणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसेल तरच या योजनेकरिता तुम्हाला लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जर लाभार्थी हा रुपये दहा लाखापर्यंत प्रकल्प राबवित असेल तर अशा वेळेस अर्जदार हा किमान सातवी उत्तीर्ण झालेला असावा लागतो. या योजनेअंतर्गत शैक्षणिक पात्रता आहे. आणि या योजनेअंतर्गत जर अर्जदार रुपये 25 लाख पर्यंत प्रकल्प राबवित असेल तर अशा वेळेस कमीत कमी 10 वी पास अर्जदार अर्ज करू शकतो.

हे सुद्धा वाचा:- गोवर्धन गोवंश योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत CMEGP 2022 अंतर्गत 50 लाख रुपयांच्या प्रकल्पामध्ये आपण नवीन किंवा सुरू असलेल्या उत्पादन व्यवसाय जसे पशुखाद्य निर्मिती प्रकल्प, चप्पल बूट निर्मिती प्रकल्प, फॅब्रिकेशन प्रकल्प आणि बेकरी उत्पादन अशा बाबींसाठी पन्नास लाख रुपयांपर्यंत प्रकल्प अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती प्रकल्प महाराष्ट्र अंतर्गत लाख रुपयांच्या प्रकल्पांमध्ये जसे सलून व्यवसाय, रिपेअरिंग व्यवसाय, ब्यूटीपार्लर अशा बाबींचा समावेश होतो. महाराष्ट्र राज्य अंतर्गत राबविण्यात येणारी ही एक तरुणांना व्यावसायिक बनवणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना महाराष्ट्र मार्गदर्शक सूचना CMEGP scheme guidelines:-

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत शहरी भागातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, महिला प्रवर्ग अपंग प्रवर्ग तसेच माजी सैनिक या अर्जदारांना बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या किमतीच्या 25 टक्के इतके अनुदान दिले जाते.

तसेच ग्रामीण भागातील वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांना 35 टक्के एवढे अनुदानही देण्यात येत आहे. आणि ग्रामीण भागातील या लाभार्थ्यांना पाच टक्के गुंतवणूक ही स्व गुंतवणूक करावी लागेल.

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र अंतर्गत उर्वरित सर्व लाभार्थ्यांना शहरी भागासाठी लाभार्थ्यांना 15 टक्के इतके अनुदान देण्यात येत आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 टक्के इतके अनुदान हे देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील लाभार्थ्यांना दहा टक्के इतके स्व गुंतवणूक  करावी लागेल

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अर्ज प्रक्रिया:-
CMEGP 2022 application Process

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे https://maha-cmegp.gov.in/ या साईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहे.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना महाराष्ट्र कागदपत्रे :-

1. पासपोर्ट आकाराचा फोटो
2. आधार कार्ड
3. मार्कशीट
4. टीसी
5. जन्म प्रमाणपत्र
6. पॅन कार्ड
7. अर्जदार जो व्यवसाय या योजने अंतर्गत सुरू करू इच्छित आहेत, त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो
8. अर्जदार हमीपत्र
9. कास्ट सर्टिफिकेट

वरील कागदपत्रे या CMEGP 2022  अंतर्गत सादर करावी लागतात.

ज्या तरुणांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा किंवा जिल्हा उद्योग केंद्र केव्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय येथे संपर्क साधावा.